सुरज कसबे, प्रतिनिधी:
Pimpri Chinchwad Smart City News: नऊ वर्षे उलटूनही कोट्यवधी रुपयांची कामे अपूर्ण ठेवल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. यासोबतच स्मार्ट सिटीच्या मालमत्ता हस्तांतरित करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
Bhandara Accident News: लग्नघरावर काळाचा घाला! वऱ्हाडाच्या व्हॅनला ट्रकची धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी कंपनी बंद
समोर आलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटीच्या १ हजार ३७८ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रकल्पांपैकी १७ प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत. अनेक कामे तर पूर्ण होण्याआधीच कालबाह्य झाली आहेत. कंपनीचे अध्यक्ष असलेले विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडील अधिकार आता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, १३ मार्च २०२६ रोजी नियुक्ती झालेल्या नवीन संचालकांना ज्यामध्ये महापौर आणि विविध पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता केवळ एक महिन्याचा कालावधी मिळाला. कंपनी बंद झाल्याने आता संचालक मंडळही बरखास्त होणार आहे. स्मार्ट सिटी मधील कामाचा निकृष्ट दर्जा आणि आर्थिक गैरव्यवहारांबाबत थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
प्रकल्पांवर मोठा खर्च होऊनही नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. थोडक्यात सांगायचे तर, कामातील दिरंगाई आणि वाढत्या तक्रारींमुळे सरकारने अखेर या कंपनीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून, स्मार्ट सिटीची उर्वरित जबाबदारी आता महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे.