Mumbai Traffic Change: PM मोदी- मॅक्रॉन यांचा मुंबई दौरा! 13 तास वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गावर प्रवेश बंदी

Mumbai Traffic Change: व्हिव्हिआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर १७ फेब्रुवारी रोजी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे मोठे बदल करण्यात आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

PM Narendra Modi and Emmanuel Macron Visit Mumbai: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. आज (16, फेब्रुवारी) चे मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईमध्ये फ्रान्सच्या अध्यक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. या व्हिव्हिआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर १७ फेब्रुवारी रोजी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचे मोठे बदल करण्यात आहेत. 

Mumbai News: एका चुकीमुळे घडली मुलुंड मेट्रो दुर्घटना; पोलीस तपासात धक्कादायक बाब आली समोर

मुंबईमध्ये वाहतुकीत मोठे बदल! 

याबाबत मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे  यांनी परिपत्रक जारी केले आहे.  त्यानुसार मंगळवारी (17, फेब्रुवारी) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोल नाक्यापर्यंत अवजड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. दोन्ही बाजूंकडील वाहतूक सामान्य वाहनांसाठी सुरू असली, तरी सुरक्षेमुळे काही ठिकाणी वेग मंदावण्याची शक्यता आहे. हे दोन्ही दिग्गज नेते मुंबईत एका संयुक्त निवेदनाद्वारे द्विपक्षीय सहकार्यावर भाष्य करणार आहेत. तसेच, एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

​या वाहनांना बंदीतून सूट

  • ​रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या.
  • ​पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेतील सरकारी वाहने.
  • ​अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी घेतलेली वाहने.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
दरम्यान, ​नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी दिला आहे.