Poḷa special! जीव ओतून कामाला साथ दिली, आता मृत्यूनंतरही त्याचीच पूजा! शेतकऱ्याचा हा आदर्श पाहिलाच पाहिजे!

Chhatrapati Sambhaji Nagar :  शेतीमध्ये शेतकऱ्यांच्यासोबत राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून बैलपोळा सण साजरा केला जातो. शेतकरी आणि बैलाचं नातं जीवाभावाचं असतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर जिल्ह्यातल्या या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा आहे.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhaji Nagar :  शेतीमध्ये शेतकऱ्यांच्यासोबत राबणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता म्हणून बैलपोळा सण साजरा केला जातो. शेतकरी आणि बैलाचं नातं जीवाभावाचं असतं. शेतकरी त्याच्या घरातील सदस्याप्रमाणे बैलाची काळजी घेतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड - तालुक्यातील हतनूर येथील एका शेतकऱ्याची सध्या चर्चा होत आहे. या शेतकऱ्यानं त्याच्या ण पावलेल्या बैलाची आठवण कायम राहावी म्हणून त्याचा प्रतिकृती पुतळा बनवून शेतात बसवून पोळा सणाच्या निमित्तानं त्याची मनोभावी पूजा करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर घालून दिला आहे. 

2 वर्षांपूर्वी झालं होतं निधन

तालुक्यातील हतनूर येथील प्रगतशील शेतकरी सुधाकर करवंदे यांचा राजा नावाचा बैल दोन वर्षापूर्वी वृद्धकाळाने मरण पावला त्याचा अंत्यसंस्कार शेतात करण्यात आले. हा बैल गेल्या पंधरा वर्षापासून करवंदे कुटुंबाकडे होता. त्यामुळे तो बैल  त्यांच्या कुटुंबंचा एक सदस्यच होता.  पंधरा शुभ्र अन देखणा असा हा बैल प्रत्येक पोळा सणाला इतरांचा लक्ष वेधून घेणारा राजा म्हणून त्याची ओळख होती. राजा आपल्याला सोडून गेल्याची सल करवंदे कुटुंबाच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी त्याचा फोटो बैलाचा पुतळा बनविणाऱ्या कारागीरास दाखवून हुबेहूब तशाच पुतळा पंचवीस हजार रुपये खर्च करून बनवून घेतला. त्या पुतळास शेतातील गुरांच्या गोठ्याच्या बाजूला एक सिमेंट ओटा बनवून बसविला. 

( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
 

आधुनिक यांत्रिक युगात काळाच्या ओघात पशुधनाची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. सध्याच्या युगात जन्मदात्या आई वडिलांचा मुलांना विसर पडल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्याचवेळी पंधरा वर्ष आपल्या शेतातील कामात मदत करण्याऱ्या बैलाचा पुतळा बसवून करवंदे कुटुंबाने एक नवा आदर्श घालून दिला आहे. या पुतळ्याची सुधाकर करवंदे व त्यांच्या पत्नी यांनी मनोभावे पूजा केल्यानंतरच त्यांचे उर्वरित बैल पोळा साजरा करण्यासाठी गावात आणले. 

राजा नावाचा बैल हा आमच्याकडे गेल्या पंधरा वर्षापासून होता दोन वर्षापासून वय झाल्याने तो मरण पावला दीर्घ काळ आमच्या सोबत राहिल्याने तो आमच्या घरातील एक सदस्यच होता त्याची आठवण आम्हला आणि आमच्या पिढीला कायम राहावी म्हणून आम्ही त्याचा हुबेहूब पुतळा बनवून शेतात बसवला असल्याची माहिती सुधाकर करवंदे यांनी दिली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article