Shegaon Temple: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शेगाव दौरा! दर्शनामध्ये मोठे बदल; मंदिर सुरु राहणार की बंद?

मंगळवार दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासनाचे वतीने रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. करिता श्रींचे दर्शन सकाळी १०.३० ते १२.०० वा. चे दरम्यान स्थगित राहील.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलढाणा: 

Shegaon Gajanan Maharaj darshan Advisory: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म  25 फेब्रुवारीला  संतनगरी शेगावच्या दौऱ्यावर येणार आहेत.  शेगांव येथे गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबीरा'चे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे, या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहतील. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यानिमित्त श्री गजानन महाराज मंदिर प्रशासनाने दर्शनाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्म  25 फेब्रुवारीला  संतनगरी शेगावच्या दौऱ्यावर येणार आहेत.  दौ-याच्या अनुषंगाने कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेची बहुस्तरीय तपासणी करण्यात येत आहे. तसेच गजानन महाराज मंदिराच्या दर्शनाबाबत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

Fact Check: भाविकांसाठी महत्त्वाचं! 25 फेब्रुवारीला शेगाव दर्शन बंद? व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्या

जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार त्यांना सर्वोच्च राजशिष्टाचार प्रदान करण्यात आलेला असल्याने सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचे उपाय सूचविण्यात आले आहेत. त्यानुसार मंगळवार दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासनाचे वतीने रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. करिता श्रींचे दर्शन सकाळी १०.३० ते १२.०० वा. चे दरम्यान स्थगित राहील.

दर्शन स्थगित..

त्याचप्रमाणे बुधवार दि.२५ फेब्रुवारी २०२६ रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री दर्शनास आगमन होत असल्याने श्रींचे दर्शन सकाळी ७.३० ते दु. १२.३० वा. पर्यंत स्थगित राहणार आहे. त्यानंतर श्री दर्शन व्यवस्था ही पूर्ववत सुरु राहील. तरी कृपया सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घेऊन श्री संस्थेस व प्रशासनास सहकार्य करावे अशी नम्र विनंती श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement

Pune Bhigwan: 'सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं?', भिगवण प्रकरणात एक नाही तर अनेक प्रश्न?