शाळेला टाळे ठोकले, पालक विद्यार्थ्यांसह पावसात उभे राहीले, 'त्या' शाळेत नेमके काय झाले?

जिल्हा परिषदेने शाळेवर आणखी एक शिक्षक द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी वारंवार केली आहे. पण त्यांच्या मागणीला केराची टोपलीच दाखवली गेलीय. त्यामुळे पालकां बरोबर विद्यार्थ्यांनी एक अनोखं आंदोलन केले.

Advertisement
Read Time: 2 mins
पालघर:

मनोज सातवी 

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात शिक्षण व्यवस्थेचा एकच गोंधळ उडालेला आहे. शिक्षणाचा जणू इथे खेळ सुरू आहे की काय असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही. जव्हार तालुक्यातील शिरोशी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहेत. एकूण पटसंख्या 42 आहे. विद्यार्थी 42 पण शिक्षक मात्र एकच अशी अवस्था हा शाळेची आहे. जिल्हा परिषदेने शाळेवर आणखी एक शिक्षक द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी वारंवार केली आहे. पण त्यांच्या मागणीला केराची टोपलीच दाखवली गेलीय. त्यामुळे पालकां बरोबर विद्यार्थ्यांनी एक अनोखं आंदोलन केले. या आंदोलनाने सर्वच जण चकीत झाले आहेत. मात्र यामुळे प्रशासनाला जाग येणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात तरी शाळेला शिक्षक मिळेल अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र 42 विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक होता. यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा गाठली. आधी शाळेला टाळे ठोकले. त्यानंतर विद्यार्थ्यांसह पालक शाळेबाहेर भर पावसात उभे राहीले. त्यांचे हे आंदेलन चर्चेचा विषय ठरले. जो पर्यंत शाळेला आणखी एक शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळेचे टाळे उघडणार नाही अशी भूमीका त्यांनी घेतली.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - '...तर राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतोच' शरद पवारांचा प्लॅन काय?

शाळेला एकच शिक्षक असल्यामुळे  विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळेच शाळेला आणखी एक शिक्षक मिळावा म्हणून पालकांनी वेळोवेळी शिक्षण विभागाला पत्र लिहीली आहेत. विनंत्या केल्या आहेत. शिक्षक नसल्यामुळे शिक्षणावर कसा परिणाम होतो हेही दाखवून दिले आहे. पण त्यावर शासन दरबारी काहीच निर्णय झालेला नाही. या आंदोनाची चर्चा आता संपुर्ण जिल्ह्यात होत आहे. त्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न गावकरी करत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लोकसभेत जे घडले ते...भाजपा कोअर कमिटीत कशावर झाली चर्चा? Inside Story

पालघर हा जिल्हा ठाणे आणि मुंबईला लागून आहे. एकीकडे मुंबई आणि ठाण्यात चांगल्या दर्जाच्या शाळा आणि शिक्षण मिळत आहे. अशा वेळी पालघरमध्ये मात्र त्याच्या उलट चित्र दिसून आले आहे. मुंबई ठाण्या प्रमाणए नाही तरी चांगले शिक्षण मिळावे अशी अपेक्षा इथल्या गावकऱ्यांची आहे. चांगल्या शिक्षणासाठी चांगले आणि पुरेसे शिक्षक असावेत असेही त्यांना वाटते. त्यांची ही मागणी आता कधी पुर्ण होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 

Advertisement