Pune Airport: पुणे विमानतळावरुन 15 नवीन उड्डाणे! सोलापूर, तिरुपती, गोवा... कोणकोणत्या शहरांचा समावेश?

"या नवीन उड्डाणांमुळे पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक जोडणीला मोठा वेग मिळेल," असा विश्वास विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी व्यक्त केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Pune Airport 15 New Slots:  पुणे विमानतळावरील हवाई वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी भारतीय हवाई दलाने १५ अतिरिक्त उड्डाण स्लॉट्सना मंजुरी दिली आहे. यामुळे पुणे विमानतळावरील एकूण स्लॉट्सची संख्या 220 वरून 235 वर पोहोचली असून, मे महिन्यापासून पुण्याहून बागडोगरा, तिरुपती आणि मंगळुरू यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

​केंद्रीय नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, हवाई दलाने दिवसाच्या वेळेतील हे 15 स्लॉट्स उपलब्ध करून दिले आहेत. "या नवीन उड्डाणांमुळे पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक जोडणीला मोठा वेग मिळेल," असा विश्वास विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी व्यक्त केला. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Advertisement

Pune News: रेशनवर आता मिळणार फक्त 'इतके' लिटर रॉकेल, वितरणाची नवी नियमावली जाहीर

महत्त्वाचे मार्ग आणि वेळापत्रक:

​तिरुपती (सोलापूरमार्गे): स्टार एअर 1 मे पासून तिरुपती-सोलापूर-पुणे ही सेवा सुरू करत आहे. पुण्यात दुपारी 3.20 ला विमान येईल आणि 4.00 वाजता सोलापूरसाठी रवाना होईल (शनिवार वगळता). शनिवारी ही वेळ 4.10 (आगमन) आणि 4.40 (प्रस्थान) असेल.

​बागडोगरा: ईशान्य भारताचे प्रवेशद्वार असलेल्या बागडोगरासाठी एअर इंडिया 1 मे पासून दररोज विमान सेवा सुरु करेल. दुपारी 12.35 ला आगमन आणि 1.15 ला पुण्यातून प्रस्थान होईल.

​मंगळुरू: फ्लाई 91 (FLY 91) कंपनी दररोज सायंकाळी 6.40 ला मंगळुरूहून पुण्यात येईल आणि 7.5 ला पुन्हा रवाना होईल.

पाटणा: इंडिगोचे विमान २ मे पासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उड्डाण घेईल. दुपारी 3.40  ला पाटणाहून निघून 6.05 ला पुण्यात पोहोचेल.

वाराणसी आणि बंगळुरू: वाराणसीसाठी आकासा एअर आणि बंगळुरूसाठी एअर इंडिया एक्सप्रेस (शनिवार वगळता) नवीन सेवा सुरू करत आहेत.

नक्की वाचा - Trending News: लंडनमध्ये ड्रीम जॉब! 40 लाखाचं पॅकेज, भन्नाट लाईफ स्टाईल, तरी ही नोकरीवर मारली लाथ,कारण...

​याव्यतिरिक्त, स्पाईसजेट गोवा-पुणे-चेन्नई, आकासा एअर वाराणसी-पुणे आणि एअर इंडिया एक्सप्रेस बंगळुरू-पुणे या मार्गावर 1 मे पासून सेवा सुरू करत आहेत. इंडिगो २ मे पासून पटना-पुणे अशी आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे चालवणार आहे. ​केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विनंतीनंतर हवाई दलाने हे अतिरिक्त स्लॉट्स मंजूर केल्यामुळे आता पुणेकरांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Advertisement