विशाल पुजारी, कोल्हापूर:
Pune bangalore Highway Heavy Traffic: तब्बल 33 तासानंतर पुणे मुंबई एक्सप्रेसवरील वाहतूक सुरु झाली आहे मात्र दोन दिवस वाहतूक ठप्प असल्याने रस्त्यावर मोठे ट्रॅफिक झाले आहे. एकीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवरील ट्रॅफिकने डोकेदुखी वाढवली असतानाच आता राज्यातील आणखी एक महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. कोल्हापुरातील किनी टोल नाका ते कराड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
किनी टोलनाका ते कराड मार्गावर ट्रॅफिक जाम....
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापुरातील किनी टोलनाका ते कराड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने किनी टोल नाका ते कराड मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गेल्या एक तासापासून वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली असून वाहने एकाच जाग्यावर थांबली आहेत.
कांद्याचा ट्रक कोसळल्याची माहिती...
कोल्हापूर ते सातारा महामार्ग रुंदीकरणाचे मागील अनेक दिवसांपासून अतिशय धीम्या गतीने काम सुरू आहे. यामुळे वारंवार अशा अपघातांच्या घटना घडत आहेत. या वाहतुक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून अपघातग्रस्त ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.