PMC Election Result: आंदेकर गँगचा मोठा विजय! सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर विजयी; धंगेकरांना धक्का

PMC Election 2026 Sonali Andekar vs Pratibha Dhangekar: वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर या निवडणूक लढवत होत्या. यापैकी सोनाली आंदेकरचा सामना माजी आमदार रविंद्र धंदेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याशी होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे:

Pune Municiple Corporation Election Result 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत एकहाती सत्ता खेचून आणली आहे. पुणे मनपा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागले होते ते प्रभाग क्रमांक 23 मधील लढतीकडे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली आंदेकर विरुद्ध माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा आंदेकर यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत सोनाली आंदेकर या विजयी झाल्या असून धंगेकरांना मोठा धक्का बसला आहे. 

आंदेकर विरुद्ध धंगेकर सामन्याचा निकाल लागला

पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घरात तिघांना उमेदवारी दिली होती. सध्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर या निवडणूक लढवत होत्या. यापैकी सोनाली आंदेकरचा सामना माजी आमदार रविंद्र धंदेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याशी होता.

Solapur Result 2026: सोलापुरात भाजपचा ऐतिहासिक विजय! काँग्रेस भुईसपाट; प्रणिती शिंदेंना धक्का

या लढतीत मतमोजणीदरम्यान काँटे की टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला सोनाली वनराज अंदेकर यांच्याविरोधात प्रतिभा धांगेकर ह्या केवळ 23 मतांनी  आघाडीवर होत्या. काहीवेळाने  सोनाली वनराज अंदेकर ह्या 909 मतांनी पुढे गेल्या. या अटीतटीच्या लढतीत अखेर सोनाली आंदेकर यांनी विजय मिळवला. दुसरीकडे, लक्ष्मी उदयकांत आंदेकर ह्या मात्र सुरुवातीला पिछाडीवर होत्या. मात्र त्यांनीही अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांनी  भाजपच्या ऋतुजा तेजस गडाळे यांचा पराभव केला. 

पुण्यामधील धक्कादायक निकाल:

दुसरीकडे, पुण्यामध्ये मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधून साईनाथ बाबर यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट ईव्हीएम मशीन बदलल्याचा गंभीर आरोप करत मोठा गोंधळ घातला. 

Advertisement

Maharashtra Election Result LIVE: पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची लाट! विरोधक भुईसपाट; वाचा अपडेट्स