Pune Crime: भररस्त्यात भयंकर दृश्य! नागरिक थांबले, घटनास्थळ पाहून पोलिसही हादरले, पुण्यात काय घडलं?

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Pune Crime:  पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. किकवी-केंजळ रस्त्याच्या कडेला एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Vande Bharat: मुंबई-बेंगळुरू दरम्यान आता स्लीपर 'वंदे भारत'! रेल्वेमंत्र्यांची मंजुरी, पुणेकरांना ही फायदा

भोर तालुक्यात खळबळ

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास किकवी-केंजळ रस्त्यावरून गावातील काही नागरिक नेहमीच्या कामासाठी जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती हालचाल न करता पडलेली दिसली. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ राजगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

Advertisement

​प्राथमिक पंचनाम्यात मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे असून, त्याच्या अंगावर निळ्या रंगाचे जर्किन, निळी जीन्स आणि पांढरा टी-शर्ट असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, राजगड पोलीस परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची शहानिशा करत आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तांत्रिक तपास करत आहेत.

Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण, Video होतोय Viral