Pune Accident: अभ्यासानंतर चहा प्यायला गर्दी.. सुसाट कारने 12 विद्यार्थ्यांना उडवलं; पुण्यातील अपघात कसा घडला?

Pune Hit And Run Case Sadashiv Peth: गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही समोर आले असून घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे: पणे शहरात घडलेल्या भयंकर हिट अँड रन प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका भरधाव कारने 12 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातामध्ये एमपीएससीची तयारी करणारे 12 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कार चहाच्या टपरीत घुसल्याने ही दुर्घटना घडली. गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही समोर आले असून घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भावे हायस्कूलजवळ असलेल्या चहाच्या टपरीवर  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिसरात गर्दी होती. त्यापैकी बरेच जण अभ्यासानंतर चहाच्या टपरीवर जमले होते. अचानक एक भरधाव ऑरा कार गर्दीत घुसली. कोणाला काही समजायच्या आतच गाडीने विद्यार्थ्यांना धडक दिली. यावेळी  मोठ्या आवाजात ओरड झाली आणि काही सेकंदातच लोक ओरडत जमिनीवर पडले होते. गाडी आत गेली, असा गोंधळ काहींनी केल्याचे सांगितले. 

घटनेनंतर लगेचच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेतली. जयराम शिवाजी मुळे (27) असे या चालकाचे नाव आहे. तो बिबवेवाडी येथील रहिवासी आहे. गाडीचा मालक दिगंबर यादव शिंदे (27) आणि सहप्रवासी राहुल गोसावी (27) हे देखील पोलिस कोठडीत आहेत. घटनांचा नेमका क्रम आणि त्यावेळी गाडीचा व्यावसायिक वापर होत होता काय़ याची सविस्तर चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आहे.

( नक्की वाचा :  GT vs MI : शुबमन गिल आणि हार्दिक पांड्यातील वाद उघड, मैदानातील 2 घटनांमुळे खळबळ! )

अपघातातील जखमींची नावे!

1) किशोर हरिभाऊ भापकर वय 57 वर्षे

2) पायल आवेश कुमार दुर्गे वय 26 वर्षे

3) गुलनाज सिराज अहमद वय 23 वर्षे

4) सोनाली सुधाकर घोळवे वय 30 वर्षे

5) मंगेश आत्माराम सुरुसे वय 33 वर्षे

6) अमित अशोक गांधी वय 45 वर्षे

7) समीर श्रीपाद भालकीकर वय 45 वर्षे

8) सोमनाथ केशव मेरुकर वय 28 वर्षे

९) प्रशांत ब्रह्मदेव बंडगर वय ३० वर्षे

10) अविनाश फाळके

11) प्रथमेश पतंगे

12) संदीप खोपडे