Mumbai Pune Ganpati Visarjan 2025 Live Updates: ''गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला...'' दहा दिवस मनोभावी सेवा केल्यानंतर शनिवारी लाडका गणरायाने निरोप घेतला. राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणपती विसर्जन पार पडले. दुसरीकडे मुंबई- पुण्यामधील विसर्जन मिरवणुका मात्र दुसरा उलटला तरी सुरुच आहेत. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून मुंबईच्या मानाच्या गणपतींसह पुण्यातील मानाचे बाप्पा मिरवणुकीसाठी बाहेर पडले. रात्री उशिरा मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले. मात्र इतर मंडळातील बाप्पांचे विसर्जन अद्याप सुरुच आहे. लालबागच्या राजासह पुण्यातील अनेक मंडळांचे विसर्जन लांबणीवर गेले असून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व गणपतींचे विसर्जन पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीचे रेकॅार्ड तुटले, 36 तास चालली मिरवणूक
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' ! पुण्यातील अखंडित गणेश विसर्जन मिरवणूक सुमारे 32 तास तर खंडित मिरवणूक तब्बल 35 तास चालली. नटेश्वर घाटावर शेवटच्या गणपतीचे विसर्जन (अमरज्योत मिञ मंडळ, काशेवाडी) रविवारी रात्री 8. 15 वाजता झाले. साधारण मिरवणूक यंदा रेकॉर्डब्रेक 35 तास चालली.
पुण्यात गेली 30 तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही विसर्जन मिरवणुका सुरू
काल सकाळी 9.30 पासून सुरू झालेल्या पुण्यातील गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुका आजही सुरूच......
गेली 30 तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही विसर्जन मिरवणुका सुरू.....
आतापर्यंत 200 पेक्षा अधिक मंडळांनी विसर्जन मिरवणूक आटपली .......
मागच्या वर्षी 29 तास चालल्या होत्या पुण्यातील विसर्जन मिरवणुका.....
वेळीआधी विसर्जन मिरवणूक आवरण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील...
पुण्यातील पाच मानाच्या गणपती विसर्जन किती वाजता झालं ?
पुण्यातील पाच मानाच्या गणपती विसर्जन किती वाजता झालं ?
6 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर
मानाचा पहिला कसबा गणपती - 3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती - 4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा तिसरा गुरुजी तालीम - 4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती - 4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती - 5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.
दगडूशेठ गणपतीचे 9:23 वाजता म्हणजे 5 तास 23 मिनिटांनी विसर्जन झाले.
भाऊ रंगारी गणपती मध्यरात्री 3 वाजता......
पुण्यात आतापर्यंत 232 मंडळांचे विसर्जन पडले पार
पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातून एकूण 232 मंडळांचे विसर्जन झाले आहे. आता केवळ 15 मंडळांचे गणपती हे बाकी आहेत. अनेक मंडळांनी मुख्य चौकात न येता परस्पर बाहेरून जाणे पसंत केले आहे. यंदाच्या मिरवणुकीला लागणारा वेळ पाहता पोलिस प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update:पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल, गर्दीच्या ठिकाणी वाजवले फटाके
पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल
अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी उडवले फटाके
नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली
एकजण ताब्यात पोलिसांच्या समोरच वाजविले चौकात फटाके
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यातील विसर्जन मिरवणुका लांबल्या!
पुण्यात सकाळी ११:३० वाजेपर्यंत १६३ गणेश मंडळ अलका टॉकीज चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाले आहेत.
अजून किमान ६०-७० मंडळ मार्गस्थ व्हायचे आहेत.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीच सुक्ष्म नियोजन केलं होतं आणि २४ तासात मिरवणूका संपवणार अस सांगितल होत
मानाचे पाच आणि बाकी महत्वाच्या मंडळांनी वेळा पाळल्या पण त्यानंतर मिरवणूक रेंगाळली.
मिरवणूक संपायला २-३ वाजण्याची शक्यता आहे.
मागच्या वर्षी मिरवनुक संपायला २:३० वाजले होते. १८९ मंडळ मार्गस्थ झाले होते. २८ तासांनी मिरवणूक संपली होती.
Ganpati Visrjan LIVE Update: समुद्राच्या भरतीची वेळ चूकल्यामुळे लालबागचा राजाच्या विसर्जन उशीराने होणार
समुद्राच्या भरतीची वेळ चूकल्यामुळे लालबागचा राजाच्या विसर्जन उशीराने होत आहे…
गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आज सकाळी आगमन झाले त्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते… त्याचवेळी गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजाचे तराफ्याजवळ आगमन होताच… वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागचा राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला… त्याचा परीणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती
दिड तास कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा आटोकाट प्रयत्नं करत आहेत
मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे भरतीचे पाणी कमी होण्याची वाट पहाण्याशिवाय पर्याय नाहीये
त्यामुळे आता लालबागच्या राजाचे विसर्जन समुद्राच्या भरतीचे पाणी थोडे कमी झाल्यावर करण्यात येईल…
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरूच
पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरूच
विसर्जन मिरवणूक सुरू होऊन झाले २४ तास
अनेक मंडळांचे विसर्जन अजून बाकी
यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला विलंब होण्याची शक्यता
काल बरोबर ९.३० वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक झाली होती सुरू
Ganpati Visrjan LIVE Update: 22 तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात होणार विसर्जन
लालबागचा राजा तब्बल 22 तासांनंतर अखेर विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. लालबाग राजासाठी यंदा नव्या अत्याधुनिक स्वयंचलित तराफ्यावरून विसर्जन होणार आहे.
मागील तराफ्याच्या तुलनेत हा तराफा हा दुप्पट मोठा असून आधुनिक आहे. हा तराफा पाण्यात ३६०डिग्रीमध्ये कुठेही वळण घेऊ शकतो. मागील वर्षीच्या तराफ्याला कोळी बांधवांच्या बोटींच्या मदतीने सुमद्रात ओढून न्ह्यावं लागत होते. हा अत्याधुनिक तराफा स्वयंचलित आहे.
Mumbai Ganpati Visarjan LIVE Updates News: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल! थोडेयाच वेळात होणार विसर्जन
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पिंपरी चिंचवडमध्ये गणेश विसर्जनावेळी चार युवक बुडाले
"पिंपरी -चिंचवडमध्ये गणपती विसर्जनला गालबोट लागल्याची घटना घडली. लाडक्या गणरायाला निरोप देत असताना वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये चार युवक पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित दोन युवकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: गणपती विसर्जनामुळे पुणे मेट्रो फुल्ल
पुण्यामध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो ने विशेष अशी सोय ठेवली होती रात्रभर ही मेट्रो सुरू ठेवण्यात येणार होती त्यामुळे शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला इतका प्रतिसाद मिळताना दिसला आहे चक्क सगळे मेट्रो स्टेशन हे गर्दीने फुल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
Pune Ganpati Visarjan LIVE Update: लालबागचा राजा वी. पी. रोडला पोहचला
लालबागचा राजा वी. पी. रोडला पोहचला आहे
7 पर्यंत गणपती गिरगांव चौपाटीला पोहोचेल
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पहाटे तीन वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ३ वाजता अलका टॉकीज चौकात दाखल झाला.. भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जन मिरवणुक पारंपारिक रसातून काढण्यात आली.. अलका टॉकीज चौकातून भंडाऱ्याची उधळण आणि अतिशबाजी करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला निरोप देण्यात आला तर ३. वाजून ५१ मिनिटांनी रंगारी गणपतीच विसर्जन पार पडलं..
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यातील विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू
पुण्यातील विसर्जन मिरवणुका अजूनही सुरू
रात्री १२ नंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती
सहा वाजल्यापासून पुन्हा डीजे सुरू
आता पुन्हा सकाळपासून डीजे चा दणदणाट सुरू होणार
अजूनही शेकडो गणेश मंडळे कुमठेकर,लक्ष्मी आणि केळकर रस्त्यावर थांबून आहेत
मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होऊन २० तास उलटले तरीही शहरात मिरवणूक सुरूच
Pune Ganpati Visarjan LIVE Update: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन, वाचा सर्व अपडेट
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले आहे. या गणपतीचे मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर 5 तास 23 मिनिटांनी विसर्जन झाले.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका टॉकीज चौकात दाखल
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका टॉकीज चौकात दाखल झाला आहे. आकर्षक अशा विद्युत् रोषणाईने सजलेल्या गणनायक रथावर दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान आहे. हा गणपती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन, वाचा दिवसभरातील सर्व अपडेट
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन झालं आहे. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणपतीचे संध्याकाळी 5 वाजून 39 मिनिटांनी विसर्जन झाले. पंचालेश्वर घाटावर बनवलेल्या कृत्रिम हौदामध्ये हे विसर्जन झाले.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे. रथात गणराय विराजमान होऊन भक्तांच्या जयघोषात मिरवणूक सुरू झाली. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी गणरायाला निरोप देण्यास सुरुवात केली.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचे पाचही गणपती अलका टॉकीज चौकातून मार्गस्थ
पुण्यातील मानाचे पाचही गणपती अलका टॉकीज चौकातून मार्गस्थ झाले आहेत. तर, त्यामधील मानाच्या चार गणपतीचं विसर्जन पार पडलं आहे. मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती विसर्जनासाठी अलका टॉकीज चौकातून मार्गस्थ झाला आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत अजित पवारांनी वाजवला ढोल, पाहा Video
पुण्यात उत्साहात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाच्या गणपतीचं भावुक वातावरणात विसर्जन होत आहे. या मिरवणुकीत उपमुख्यमंंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी यावेळी ढोलही वाजवला.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाच्या दुसऱ्या गणपतीचे विसर्जन, 'दगडूशेठ' च्या मिरवणुकीला सुरुवात
पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे झाले विसर्जन. पतंग घाटावर बनवलेल्या कृत्रिम हौदामध्ये या बाप्पाचे विसर्जन झाले. संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी हे विसर्जन झाले. दरम्यान पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा चौथा गणपती अलका टॉकीज चौकात दाखल
पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती हा अलका टॉकीज चौक म्हणजे टिळक चौकात आता दाखल झाला आहे
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमचे अलका चौकात आगमन
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे अलका चौकात आगमन झालं आहे. गुलाल उधळत आणि बँड वाजवत गणपतीचं आगमन झालं आहे. 'गुलालाची उधळण' ही या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचे अलका चौकात आगमन
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी च अलका चौकात आगमन
ढोल ताशा पथकाच्या वादनाने होत आहे स्वागत
Pune Ganpati Visarjan LIVE Update: शेतीचे साहित्य वापरुन कृषी गणेश, पुण्यातील गणपती चर्चेत
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक आणि मीच वेगळेपणा आणि सामाजिक संदेश देणाऱ्या ठरत असतात, नारायण पेठ मधील संयुक्त प्रसाद या मित्र मंडळाने यंदा विसर्जन मिरवणूक मध्ये कृषी गणेश या देखावा केलाय, शेतीकामासाठी वापरण्यात येणारी बैल गाडी, ट्रॅक्टर, विडा, खुरपे, बुजगावणे, फवारणी यंत्रे आदी साहित्य वापरून कृषी गणेश साकारलेला आहे,
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा पहिला गणपती अलका टॉकीज चौकात दाखल
मानाचा पहिला कसबा गणपती अल्का टॉकीज चौकात दाखल
सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला झाली होती सुरुवात
कसबा गणपती अल्का टॉकीज चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ
प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या एक तास आधी कसबा गणपती अलका टॉकीज चौकात
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा पहिला कसबा गणपती अलका टॉकीज चौकात दाखल
पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे आगमन अलका टॉकीज चौकात आगमन
इथून पुढे विसर्जन घाटावर होणार विसर्जन
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा पहिला कसबा गणपती अलका टॉकीज चौकात दाखल
पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे आगमन अलका टॉकीज चौकात आगमन
इथून पुढे विसर्जन घाटावर होणार विसर्जन
Pune Ganpati Visarjan LIVE Update: गुरुजी तालीम गणपती बेलबाग चौकात दाखल
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती समाधान ( बेलबाग चौकात दाखल झालाय. गणपती बाप्पाच्या रथासमोर समोर सनई चोवघडा वाजवला जातोय. तर पारंपारिक वाद्य वाजवत त्याचबरोबर गुलालाची उधळण करत मानाचा तिसरा गणपती विसर्जन मार्गांवर पुढे पुढे सरकत आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पहिला मानाचा गणपती अलका चौकात पोहोचणार, स्वागतासाठी भव्य रांगोळी
पुण्यामधील सर्व मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु आहे. थोड्याच वेळात पहिला मानाचा गणपती अलका चौकात पोहोचणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी अलका चौकात भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: केसरी वाडा गणपतीनेही मोडला नियम
गुरुजी तालीम नंतर मानाचा पाचव्या गणपतीने म्हणजे केसरीवाड्याने देखील मोडले नियम! ढोल ताशा वादनाला आत्ता मंडई चौकात सुरूवात केली आहे...
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा तिसरा गणपती! तांबडी जोगेश्वरी मंडळांची मिरवणूक लक्ष्मी रोडवर दाखल
पुण्याच्या मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळांची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवर दाखल झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत ताल , विघ्नहर्ता आणि शिवमुद्रा ही ढोलपथके सहभागी झाली आहे. चांदीच्या पालखीमध्ये श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आली असून मागे ट्रॅक्टर वर माता तांबडी जोगेश्वरी ची मूर्ती ही ठेवण्यात आली आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती मंडई चौकात दाखल
पुणे
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती मंडई चौकात दाखल
पारंपारिक वाद्य वाजवत गणपती बाप्पाच आगमन
Pune Ganpati Visarjan LIVE Update:गुरुजी तालीम मंडळाने मोडला नियम, पाठीमागील मंडळांना विलंब झाला
गुरुजी तालीम मंडळाने मोडला नियम! परवानगी नसताना मंडई चौकात ढोल ताशाचा मंडळाकडून वादन:
मानाच्या तिसऱ्या गणपती मंडळाने नियम मोडल्याने १ तास स्थिर वादन चालू असल्याने मागच्या गणपती मंडळांना झाला विलंब
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा चौथा गणपती मंडई चौकात दाखल
मानाचा चौथा गणपती मंडई चौकात दाखल
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडई चौकात दाखल
तब्बल एक तासाने मंडई चौकात दाखल
मानाच्या तिसऱ्या गणपती मंडळाने नियम मोडल्याने १ तास स्थिर वादन चालू असल्याने मागच्या गणपती मंडळांना झाला विलंब
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यातील 17 रस्ते राहणार बंद!
शिवाजी रोड: काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक (सकाळी 7:00 पासून)
लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 7:00 पासून)
बाजीराव रोड: सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक (दुपारी 12:00 पासून)
कुमठेकर रोड: टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक (दुपारी 12:00 पासून)
गणेश रोड: दारूवाला पूल ते जिजामाता चौक (सकाळी 10:00 पासून)
केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक (सकाळी 10:00 पासून)
टिळक रोड: जेधे चौक ते टिळक चौक (सकाळी 9:00 पासून)
शास्त्री रोड: सेनादत्त चौकी चौक ते अलका (दुपारी 12:00 पासून)
जंगली महाराज रोड: झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)
कर्वे रस्ता: नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक (सायं. 4:00 पासून)
फर्ग्युसन रोड: खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट (सायं. 4:00 पासून)
भांडारकर रस्ता: पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक (सायं. 4:00 पासून)
पुणे-सातारा रोड: व्होल्गा चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)
सोलापूर रोड: सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक (सायं. 4:00 पासून)
प्रभात रोड: डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक (सायं. 4:00 पासून)
बगाडे रोड: सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी 9:00 पासून)
गुरू नानक रोड: देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक (सकाळी 9:00 पासून)
Pune Ganpati Visarjan Miravnuk LIVE Update: पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी सुरु होणार? वाचा सर्व नियोजन
पुण्याचा राजा आणि मनाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती मंडई चौकात दाखल:
Pune Ganpati Visarjan LIVE Update: अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून कसबा गणपतीच्या पालखीला खांदा
अजित पवार चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुण्याच्या मानाचा पहिला कसबा गणपतीच्या पालखीला खांदा
पुण्याची मिरवणूक सुरू
मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा तिसरा गणपती: गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.. उत्सव मंडपातून मूर्ती देशी विदेशी फुलांनी सजवलेल्या आकर्षक अशा रथा मध्ये विराजमान करण्यात आली आहे. रथावर नंदी, त्रिशूळ आणि वरती भगवान शिव पार्वती यांची मूर्ती व मध्ये भागी बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात,
पुण्याचा मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात.
विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे चौघडा गाडी त्यामागे गंधर्व बँड पथक आणि हत्ती वरती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती.
पालखीमध्ये श्रींची मूर्ती.
Pune Ganpati Visarjan LIVE Update: कसबा गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवर
पुण्याचा मानाचा पहिल्या कसबा गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवर आली..
विसर्जन मिरवणुकीला रमणबाग, परशुराम, रुद्रगर्जना ढोल पथकांची वादन सेवा......
विसर्जन मिरवणूक पाहायला पुणेकरांची तोबा गर्दी.......
Pune Ganpati Visarjan LIVE Update: मानाचा पहिला कसबा गणपती मंडई चौकात दाखल
पुण्याचं ग्रामदैवत आणि पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती मंडई चौकात दाखल
पालकमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडणार कसबा गणपतीची आरती
कसबा गणपतीची आरती पार पडल्यानंतर पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला होणार सुरुवात
तर निलम गोरहे, चंद्रकांती पाटील, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे देखील उपस्थित
Pune Ganpati Visarjan LIVE Update: पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक कधी सुरु होणार? वाचा सर्व नियोजन
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचं नियोजन
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.३० वाजता
बेलबाग चौकः १०.१५ वाजता
कुंटे चौकः ११.४५ वाजता
विजय टॉकीज चौकः १.४० वाजता
टिळक चौक: २.४५ वाजता
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.४५ वाजता
बेलबाग चौकः १०.३० वाजता
कुंटे चौकः १२ वाजता
विजय टॉकीज चौकः १.५५ वाजता
टिळक चौकः ३ वाजता
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १० वाजता
बेलबाग चौकः ११ वाजता
कुंटे चौकः १२.४५ वाजता
विजय टॉकीज चौकः २.३० वाजता
टिळक चौकः ३.३० वाजता
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.१५ वाजता
बेलबाग चौकः ११.३० वाजता
कुंटे चौक: १.३० वाजता
विजय टॉकीज चौकः ३ वाजता
टिळक चौकः ४ वाजता
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा
लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.३० वाजता
बेलबाग चौकः १२ वाजता
कुंटे चौकः २ वाजता
विजय टॉकीज चौकः ३.३० वाजता
टिळक चौक: ४.३० वाजता