यशपाल कांबळे, पुणे:
Bhimashankar Temple News: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे येत्या ३१ मेपासून भाविकांसाठी पुन्हा एकदा उघडले जाणार आहेत. मंदिराच्या मुख्य सभामंडपाची पुनर्बांधणी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव गेल्या साडेतीन महिन्यांपासून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. आता ही विकासकामे अंतिम टप्प्यात असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
West Bengal: सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची हत्या! पाठलाग करुन अडवलं, गोळ्या झाडून संपवलं
भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार..
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत भीमाशंकर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येत आहेत. विशेषतः गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा या दोन महत्त्वाच्या बाबींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जानेवारी महिन्यात जेव्हा हे काम सुरू झाले, तेव्हा ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कामाची व्याप्ती आणि गुणवत्तेचा विचार करता ही मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली होती.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कुंभमेळ्यादरम्यान भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन सभामंडपाची रचना आणि परिसरातील सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यामुळे आता भाविकांना रांगेत उभे राहताना कमी त्रास होईल आणि दर्शन प्रक्रिया अधिक वेगवान व सुरक्षित होईल. जिल्हा प्रशासनाने या कामाचा आढावा घेतला असून, ३१ मे रोजी मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा राजीनामा! त्यांच्या जागी 'या' 4 नावांची चर्चा, वर्णी कुणाची लागणार?