Pune Rain Alert News: मुंबईसह पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून सर्वत्र मुसळधार ते अति मुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने मुंबई पुणे वाहतूक दोन्ही मार्गाने पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अशातच प्रशासनाने नागरिकांना मोठे आवाहन केले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना मोठे आवाहन
पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक जारी केले आहेत. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. असंही सांगण्यात आले आहे.
Mumbai Pune Rain LIVE: पुण्यात पावसाचा हायअलर्ट! लोणावळा घाटात ट्रॅफिक जाम; वाचा सर्व LIVE अपडेट्स
हे क्रमांक जवळ ठेवा..
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष
- लँडलाईन : ०२०-२६१२३३७१
- टोल फ्री हेल्पलाईन : १०७७
- मोबाईल : ९३७०९ ६००६१
पुणे महानगरपालिका (PMC)
- ०२०-२५५०१२५९
- ०२०-२५५०६८००
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)
- ०२०-६७३३११११
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल (PDRF)
- ९५४५२ ८२९३०
Maharashtra Rain: पुणेकरांनो सावधान! आज अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी