राहुल कुलकर्णी, पुणे: पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचे मालक कै. जगन्नाथ शेट्टी यांच्या जावई, विश्वजीत जाधव, यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर त्यांच्या पत्नी निकिता शेट्टी यांच्या नावावर बनावट सह्या करून 5 कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश चौधरी आणि आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीला बळकावण्याचा आरोप हॉटेल मालक जगन्नाथ शेट्टी यांच्या कन्या निकीता शेट्टी यांना केला होता. बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप निकीता शेट्टी यांनी केला होता. तसेच कौटुंबिक छळाचाही आरोप करत त्यांनी पती, दीर, सासून आणि सासऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. जून 2018 पासून हा प्रकार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.
निकीता शेट्टी यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती विश्वजीत विनायकराव जाधव (वय 38), दीर अभिजित विनायकराव जाधव सासरे (वय40),विनायकराव जाधव (वय 65), आणि सासूनवैशाली विनायकराव जाधव (वय 60) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याचप्रकरणी आता विश्वजीत जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश चौधरी आणि आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकिता शेट्टी यांनी आपल्या पतीवर आणि इतर आरोपींवर हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पतीने त्यांना नशा देऊन त्यांच्या नावावरून हॉटेलची मालकी हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पतीने त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीला घेऊन दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत, आणि पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे.