यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Ketan Agrawal Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. केतनच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांनाही २९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात सर्वात खळबळजनक ट्वीस्ट आला झाला असून सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या मोबाईल हिस्ट्रीमधून अत्यंत गंभीर खुलासे झाले आहेत.
सिया गोयलचं ४-५ मित्रांसोबत चॅटिंग, चेतनचीही हिस्ट्री समोर
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिया गोयल तसेच चेतन चौधरीचे इतरही मुलींसोबत संबंध असल्याचा धक्कादायक दावा पोलिसांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात केतन अग्रवालसोबत लग्न ठरल्यानंतरही सिया आणि चेतन अनेक हॉटेलमध्ये भेटल्याचे पुरावे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी तब्बल चार ते पाच हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहेत.
तसेच सिया गोयलच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये धक्कादायक व्हिडिओ आणि चॅट्सही सापडले आहेत. यामध्ये सिया गोयल चार ते पाच मुलांसोबत चॅटिंग करत असल्याचे समोर आले आहे तसेच तर चेतन देखील चार ते पाच मुलींसोबत प्रेम संबंधात असल्याचे पोलिसांकडे पुरावे सापडले आहेत. दोघेही चार ते पाच मित्रांशी सातत्याने संपर्क करत होते, अनेक हॉटेल्समध्ये त्यांच्या भेटीगाठी झाल्याचे समोर आल्याने ते आणखी कोणता अवैध उद्योग करत होते याबाबत पोलीस तपास करत आहेत.
जपानी VIDEO, केतनला स्लो पॉयझन देण्याचा कट
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल डेटा आणि डिलीट केलेल्या वेब हिस्ट्रीच्या तपासातून एक हादरवणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या अपघातासारखी भासवण्याचा आरोपींचा कट असल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. तसेच लोहगडावरील घटनेपूर्वी त्यांनी केतनला 'स्लो पॉयझन' देण्याचा कट रचल्याचाही पोलिसांचा दावा आहे.
सिया आणि चेतनने केतनच्या हत्येनंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी जपानी पॉडकास्टचे व्हिडिओ पाहिल्याचाही तपासात दावा करण्यात आला आहे. पोलीस चौकशीत शांत राहणे आणि दिशाभूल करणारी उत्तरे देण्याबाबतचे व्हिडिओ पाहिल्याची माहिती समोर आली आहे. थोडक्यात या दोघांनीही अत्यंत थंड डोक्याने केतनच्या हत्येचा कट रचल्याचं तपासातून समोर येत आहे. जोपर्यंत पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात अधिकृत आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करत नाहीत, तोपर्यंत कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालय दर 14 दिवसांनी आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवत राहणार आहे.
Nagpur News: रीलच्या नादात जेल; एका डायलॉगमुळे तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या