रेवती हिंगवे, पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे गर्दीच्या वेळी पुण्यातील मेट्रोची फेरी दर सहा मिनिटाला असेल. 15 ऑगस्टपासून पुण्याची मेट्रो सेवा आणखी जलद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या गर्दीच्या वेळेत (9 ते 11, 4 ते 8) दर 7 मिनिटाला 1 ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे पुरविण्यात येत आहे. आता 15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर 6 मिनिटाला सेवा पुरविण्यात येणार आहे. विना गर्दीच्या वेळी मात्र दर १० मिनिटाला एक ट्रेन असणार आहे. सद्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून 490 फेऱ्यांव्दारे मेट्रो सेवा पुरवत आहे.
Pune Metro: पुणे मेट्रोचा डेली पास कुठे आणि कसा मिळेल? किती पैसे लागतील?
दर ६ मिनिटाला ट्रेन सेवा यामुळेअधिक 64 फेऱ्या वाढणार आहे. दिनांक 15 ऑगस्टपासून एकूण फेऱ्या 554 वाढणार आहे. अधिकच्या 64 फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. दर 6 मिनिटाला ट्रेन चालवण्यास मेट्रोदोन महिन्यापासून प्रयत्नशिल होती. त्या अनुषंगाने अनेकवेळा चाचण्या घेण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर दि. 15 ऑगस्टपासूनदर 6 मिनिटाला सेवा हा निर्णय घेण्यात आला आहे.
जुलै, २०२५ या महिन्यामध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या १,९२,००० पर्यंत वाढली . ऑगस्ट, २०२५ मध्येप्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. आज पर्यंत ऑगस्ट २०२५ मध्ये प्रवाशांची सरासरी संख्या २,१३,६२० निदर्शनास आली आहे.
(नक्की वाचा: माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी, पुणेकरांसाठी आनंदवार्ता )