VIDEO: मोठा अपघात टळला! छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचे कार पार्किंगमध्ये लँडिंग, पायलटकडून गंभीर चूक

छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्यामध्ये हेलिपॅड सोडून पार्किंगमध्ये लँडिग केल्याची घटना घडली आहे. पायलटच्या चुकीमुळे हा गंभीर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून छगन भुजबळ मोठ्या अपघातातून बचावलेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhagan Bhujbal Helicopter News:  राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या विमान लँडिंगवेळी मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे पुण्यामध्ये हेलिपॅड सोडून पार्किंगमध्ये लँडिग केल्याची घटना घडली आहे. पायलटच्या चुकीमुळे हा गंभीर प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून छगन भुजबळ मोठ्या अपघातातून बचावलेत. 

Mumbai News: वाहतूक पोलिसांनी मागितला 'इतका' दंड, रिक्षाचालक थेट फिनाईल प्यायला.. मुंबईत खळबळ

नेमकं काय घडलं? 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर पायलटने हेलिपॅड ऐवजीं चक्क कार पार्किंगमधे उतरवण्याच्या प्रकार घडला आहे. या गंभीर प्रकारामुळे पोलिसांसह अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. पुण्यातील पुरंदर येथे हा गंभीर प्रकार घडला. 

Advertisement

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील  खानवडीमधे महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला छगन भुजबळ पोहचत होते. त्यासाठी भुजबळांचे हेलिकॉप्टर खानवडी गावात पोहचले. हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड वेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आले होते. मात्र कार पार्किंगमधील मोकळी जागा पाहून पायलटला इथेच हेलिपॅड असावं असं वाटलं आणि त्याने तीथे हेलिकॉप्टर उतरवले. त्यानंतर पोलिसांनी पायलटला याची कल्पना दिल्यानंतर ते हेलिकॉप्टर तिथून हलविण्यात आले.

Thane News: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवली! NCP अजित पवार गटाची 100 सदस्यांची कार्यकारिणी बरखास्त