Pune Metro News: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रवास लांबला! मार्चची डेडलाईन फोल; नेमकी कधी होणार सुरु?

मेट्रो मार्गिका सुरू होण्यास विलंब होत असल्याने हिंजवडी आय टी पार्क मधील हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Hinjewadi-Shivajinagar Metro News: माण हिंजवडी- शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन तीन मार्गाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हा मेट्रो मार्ग मार्च अखेरीस सुरु होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र पुणेकरांना या मार्गावरुन प्रवास करण्यासाठी आणखी काही महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा मेट्रो मार्ग दोन टप्प्यांमध्ये सुरु होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून दोन महिन्यांनी हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो कधी सुरु होणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकल्पामध्ये काही तांत्रिक कामे आणि आवश्यक परवानग्या प्रकिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे किमान पुढील दोन महिने ही मेट्रो सेवा सुरू होऊ शकणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केला आहे. त्यामुळे आता हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो ही जुलै महिन्यात धावणार हे आता स्पष्ट झालं आहे.  मेट्रो मार्गिका सुरू होण्यास विलंब होत असल्याने हिंजवडी आय टी पार्क मधील हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.

Advertisement

Nagpur Crime: मुलींच्या कराटे संघासोबत ट्रेनमध्ये भयंकर प्रकार! असहाय्य मुलींचा आक्रोश, रेल्वे पोलिसांवर संताप

 हिंजवडी ते शिवाजीनगर ही मेट्रो 3 मार्गिका 23.5 किलोमीटर ची असून यावर 23 स्थानके आहेत, यापैकी काही स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून साधारण 10 ते 12 स्थानके अद्याप अपूर्ण आहेत. पुढील काळात लवकर ही कामे पूर्ण करण्याचा निर्धार मेट्रो प्रशासनाचा आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्याने हिंजवडी मधील वाहतूक कोंडी सोडवण्यास मोठा हातभार लागणार आहे.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका

या मेट्रो मार्गावर  एम्बेसी क्वाड्रोन बिजनेस पार्क, डोहलेर, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी आणि वाकड चौक ही महत्त्वाची गर्दीच्या ठिकाणांवरील स्थानके आहेत. त्याचसोबत बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, ॲग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर असा प्रवास असेल. या मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. 

Admapur Yatra: बाळूमामाच्या भंडारा यात्रेत धक्कादायक प्रकार! 35 भाविक रुग्णालयात; प्रशासन अलर्ट