HSC Exam Result: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख जाहीर! कधी अन् कसा पाहाल?

HSC Exam Result: उद्या म्हणजेच 5 मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: सीबीएससी बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? याची विद्यार्थ्यांसह, पालकांमध्ये उत्सुकता आहे. याबाबतच आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच 5 मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे.

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 1 वाजता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. निकालाआधी उद्या सकाळी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. ज्यामध्ये निकालाबाबत महत्वाची माहिती देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काही दिवसांपूर्वीच दहावी तसेच बारावीचा निकाल 15 मे रोजी लागणार असल्याचे समोर आले होते. मात्र आता अधिकृत तारीख समोर आली असून 5 मे रोजी दुपारी 1 वाचता बारावीचा निकाल लागेल.

नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप

या संकेत स्थळांवर पाहता येईल निकाल:

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com