रेवती बिंगवे, प्रतिनिधी:
Pune PMP News: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) प्रवासी सेवेपेक्षा ज्या मार्गावर अधिक उत्पन्न मिळते, त्या मार्गावर रिशेड्युल करून बस सोडण्यात येत आहेत. गेल्या एका महिन्यात कमी उत्पन्न देणारे चार मार्ग बंद करण्यात आले असून, 64 मार्गावर नव्या वेळापत्रकानुसार रिशेड्युल करून पीएमपी धावत आहेत.
Pune News: वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका! शहरातील हे 17 रस्ते होणार 'सुपरफास्ट'
मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यामध्ये अजूनही मोठी तफावत आहे तर आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी 'पीएमपी'कडून 1 जूनपासून तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; परंतु प्रशासनाकडून एवढ्यावरच न थांबता आता ज्या मार्गावर कमी उत्पन्न मिळते, ते मार्ग बंद करण्यात येत आहेत. शिवाय ज्या मार्गावर उत्पन्न मिळते परंतु वेळेचे नियोजन चुकते, अशा 64 मार्गावर नव्याने रिशेड्युल करून बस सोडण्यात येत आहेत.
'पीएमपी'च्या सुरू असलेल्या मार्गावर कमी उत्पन्न मिळणाऱ्या मार्ग क्र. 36, 258, 67 आणि 367 अ या चार मार्गांची सेवा बंद केली. तसेच इतर 64 मार्गावर ज्या वेळी प्रवासी संख्या जास्त आहे, त्याचे नियोजन करून नव्या सुधारित वेळेनुसार पीएमपी धावत आहेत. तसेच प्रवासी सेवा देण्याबरोबरच वार्षिक होणारा संचलन तूट कशी कमी करता येते, हे धोरण अवलंबिले जात आहे.
'पीएमपी'कडून 381 मार्गांवर शहर आणि जिल्ह्याच्या भागात प्रवासी सेवा देण्यात येते. तिकीट दर वाढविण्यापूर्वी हे सर्व मार्ग तोट्यात होते. 'पीएमपी'च्या ताफ्यात नव्याने बस दाखल झाल्यावर 64 मार्गांवर सुधारित वेळेचे नियोजन करून बस सोडण्यात येत आहे. शिवाय ज्या मार्गावर उत्पन्न अत्यल्प आहे, असे चार मार्ग बंद केले आहेत,” असे सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक यांनी दिली आहे.
Pune News : गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांवर यावर्षी कोणतेही खटले दाखल होणार नाहीत : पुणे पोलीस
दरम्यान, आकडेवारीकडे बघता पीएमपी चे एकूण 17 आगार आहेत, 389 मार्ग आहेत, 10 लाख सरासरी दैनंदिन प्रवासी आहेत तर पीएमपीएमएल होणार रोजचा उत्पन्न 2 कोटी 10 लाख आहे. तिकीट दरवाढीनंतर पण ज्या मार्गांवर तोटा होत आहे असे 4 मार्ग बंद करण्यात आले आहेत.