Megablock News: पुणे रेल्वे स्टेशनवर 9 तास मेगाब्लॉक! अनेक एक्सप्रेस रद्द, मार्गही बदलले, प्रवासाआधी 'हे' वाचा

पुणे विभागातर्फे पुणे यार्ड (पुणे-दौंड विभाग) येथे रविवारी, (दि. २) सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नऊ तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Railway Megablock News:  मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे यार्ड (पुणे-दौंड विभाग) येथे रविवारी, (दि. २) सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नऊ तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.  रविवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत 'ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १, पुणे यार्डकडे जाणारी 'अप' (UP) मुख्य मार्गिका आणि मार्गिका क्रमांक १ ते ६ यांवरून गाड्यांची ये-जा होणार नाही. या निर्बंधांचा उपनगरीय (लोकल), एक्सप्रेस आणि DEMU सेवांवर परिणाम होईल.

1st August Rule Change: LPG, रेल्वे तिकीट ते बँका.. 1 ऑगस्टपासून 5 नियम बदलणार; तुमच्या खिशाचा ताण वाढणार?

२ ऑगस्ट रोजी कोणत्या गाड्या रद्द? 

  • - ९९९०२ पुणे-तळेगाव उपनगरीय (लोकल)
  • - ९९९०३ तळेगाव-पुणे उपनगरीय (लोकल)
  • - ९९८१८ पुणे-लोणावळा उपनगरीय (लोकल)
  • - ९९८१७ लोणावळा-शिवाजीनगर उपनगरीय (लोकल)
  • - ११०७ CSMT मुंबई-पुणे एक्सप्रेस
  • - ११०८ पुणे-CSMT मुंबई एक्सप्रेस
  • - ७१४०७ पुणे-दौंड DEMU

निर्धारित स्थानकाआधीच प्रवास संपणाऱ्या  गाड्या| Short Terminate Trains

  • - २९४० जयपूर-पुणे एक्सप्रेस (१ ऑगस्ट रोजी सुटणारी): खडकी येथे प्रवास संपेल.
  • - १२१३६ नागपूर-पुणे एक्सप्रेस (१ ऑगस्ट रोजी सुटणारी): हडपसर येथे प्रवास संपेल.
  • - ११४०६ अमरावती-पुणे एक्सप्रेस (१ ऑगस्ट रोजी सुटणारी): हडपसर येथे प्रवास संपेल.
  • - १२१२७ CSMT मुंबई-पुणे एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): खडकी येथे प्रवास संपेल.
  • - ११०७८ जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस (३१ जुलै रोजी सुटणारी): हडपसर येथे प्रवास संपेल.
  • - ९९८१३ लोणावळा-पुणे उपनगरीय (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): शिवाजीनगर येथे प्रवास संपेल.
  • - ७१४०६ बारामती-पुणे DEMU (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): दौंड येथे प्रवास संपेल. 

पुणे स्थानकाऐवजी खालील गाड्या सुटण्याचे स्थानक बदलणार..

  • ९९८२० पुणे-लोणावळा उपनगरीय सेवा (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी शिवाजीनगर येथून सुटेल.
  • १२९३९ पुणे-जयपूर एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी खडकी येथून सायंकाळी ५:३५ वाजता सुटेल.
  • १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी हडपसर येथून सायंकाळी ५:४५ वाजता सुटेल.
  • १२१२८ पुणे-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस (२ ऑगस्ट रोजी सुटणारी): ही गाडी खडकी येथून सायंकाळी ५:५५ वाजता सुटेल.

 Maharashtra Rain: सावधान! राज्यात पावसाचा हाय अलर्ट, 31 जिल्ह्यांना झोडपणार; कुठे कुठे बरसणार?

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सल्ला दिला आहे की, प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी गाड्यांची अद्ययावत स्थिती आणि सुधारित वेळापत्रक तपासावे; कारण या बदलांमध्ये काही गाड्या रद्द करणे, तसेच काही गाड्यांचा प्रवास मध्येच संपवणे (short termination) किंवा मध्येच सुरू करणे (short origination) यांचा समावेश आहे.

Advertisement