Pune Dam Water Level: पुणेकरांचं टेन्शन मिटलं! पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांंमध्ये 'इतका' पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Pune District 4 Dams Water Level: पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणं मिळून 90 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Maharashtra Rain Pune Dam Water Level:  गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह खडकवासला धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.  पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणं मिळून 90 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे  पुण्यातील चार धरणं मिळून 90 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 23 टी एम सी पाणीसाठ्याची नोंद झाली होती. सध्या धरणात खडकवासला: ६९.५२ टक्के, पानशेत: ९०.८८ टक्के, वरसगाव: ९३.४९ टक्के, टेमघर: ८३.७८ टक्के असा एकूण ८९.६४ टक्के म्हणजेच २६.१४ इतका पाणीसाठा तयार झाला आहे. 

Kolhapur Rain News: कोल्हापुरात मुसळधार! राधानगरी 100 टक्के भरलं, 44 बंधारे पाण्याखाली

पाणीसाठा वाढल्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे.  सकाळी ९ वाजता ४०२६ क्युसेक्स ने विसर्ग सुरू राहणार आहे.  खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ केली जाणार आहे. १७१० क्युसेक्स ने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आता ४०२६ वर केला जाणार आहे. रात्री झालेल्या पावसामुळे पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

भाटघर, वीर धरणातून विसर्ग सुरु

पावसामुळे धरणांत वाढलेला जलसाठा लक्षात घेता, भाटघर व वीर धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे, अशी माहिती संबंधित पाटबंधारे विभागांनी दिली आहे. भाटघर धरण (ता. भोर, जि. पुणे) हे ९५.२९% क्षमतेने भरले असून, रात्री8.30 वाजता धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 1631 क्युसेक आणि सांडव्याद्वारे १६५० क्युसेक, असा एकूण ३२८१ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

Advertisement

पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते. वीर धरणातूनही रात्री १२ वाजता नीरा नदीपात्रात विसर्ग वाढवून 9986 क्युसेक करण्यात आला आहे. नदीच्या दोन्ही तीरावरील गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये बांधकाम साहित्य, कामगार, पंप, गुरे व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. 

उजनी धरणातूनही भीमा नदीत विसर्ग सुरु

दरम्यान,  उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 36 हजार 600 क्युसेक एवढ्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आज सकाळी सात वाजल्यापासून पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे.  उजनी धरण सध्या 96 पूर्णांक 26 टक्के क्षमतेने भरलेल आहे. उजनीत सध्या एकूण पाणी साठवन क्षमतेच्या 115 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

Advertisement

Pune News: पवना आणि भाटघर धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ, नागरिकांना महत्त्वाचा इशारा

मात्र पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये 34 हजार 233 क्युसेक इतक्या दाबाने पाण्याची आवक होत असल्याने पूर परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी उजनी धरण प्रशासनाने कालपासूनच भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.