Hinjewadi Water Crisis: हिंजवडी आयटी पार्कचे 'वॉटर पार्क' का होते? जलकोंडीची मानवनिर्मित कारणे समोर

संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकतीच लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेत संबंधितावर कारवाई करण्याचे तसे निर्देश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pune Hinjewadi IT Park Water Crisis: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्यानंतर हिंजवडीमधील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. छोट्याशा पावसानंतरही आयटी पार्क तुंबत असल्याने नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून आयटीनगरी हिंजवडी परिसरात नियमांचा भंग करून नैसर्गिक ओढे- नाल्यांचा पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळेच पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचं आता उघडकीस आले आहे.

(नक्की वाचा-  Love Story: नवऱ्यासमोरच पत्नीने केलं पुतण्यासोबत लग्न! अजब प्रेमाची देशभर चर्चा)

पीएमआरडीएसह एमआयडीसी हद्दीतील जवळपास 13 ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदलून तसेच तो  रोखणाऱ्यांवर आता कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकतीच लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेत संबंधितावर कारवाई करण्याचे तसे निर्देश दिले आहेत.

Advertisement

पी एम आर डी ए सह , एमआयडीसी हद्दीतील ओढे - नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह काही तेथील कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर अडवत तसेच तसेच त्या प्रवाहाच्या वाटेत बदल करत आहेत. काही ठिकाणी तर मनमर्जीप्रमाणे बांधकामे करण्यात आल्याचे दिसून येत आहेत, त्यामुळं संबंधित बांधकामे ही थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्या तसेच नियमबाह्य पद्धतीने बांधकामे करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया आगामी काही दिवसात करण्यात येणार असल्याचं पी एम आर डी ए प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Jalgaon News : संपत्तीचा मोह! निलंबित पोलिसाने भाच्याला संपवलं, कसा रचलं कट?)

हिंजवडीसह परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा रस्ते दुरुस्तीसह नागरी सोयी सुविधांच्या अनुषंगाने बहुतांश कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली असून ,हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगतचा राडारोडा हटवणे, गटार व नालेसफाई, खड्डे बुजवणे यासह इतर आवश्यक ती कामे पूर्ण झाल्याने नागरी समस्या निश्चितच सुटणार असल्याचं प्रशासनाने म्हटले आहे. यासह पीएमआरडीए आणि एमआयडीसी हद्दीतील नैसर्गिक ओढे - नाल्यांतील पाण्याचा प्रवाह परस्पर अडवला तसेच बदल्यात आला अशी 13 ठिकाणे शोधण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधितांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करावा, अन्यथा त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचं पी एम आय डी ए प्रशासनाने म्हटले आहे.

Advertisement

हिंजवडी माण मधील कोणत्या  भागात रोखण्यात आला ओढ्या नाल्यांचा प्रवाह ?

1) ग्लोबल सेझ टेक पार्कजवळ, भोईरवाडी
2) टाटा कन्सल्टन्सीजवळ, भोईरवाडी
3) मेट्रो पोलिस मेट्रो स्टेशनजवळ, माण
४) माण देवी मंदिर -1 माण 
4) माण देवी मंदिर, ग्रामपंचायत 
5) स्मशान भूमी, माण
6) टेक महिंद्रा आयटी पार्कजवळ, माण
7) क्वाड्रॉन मेट्रो स्टेशन वन विभागाच्या जागेलगत, माण
8) गट नं. 286 जवळ, माण
9) गट नं. 286 जवळ, माण
११) गट नं. 281 जवळ, माण
10) गट नं. 279 जवळ, माण
11) गट नं. 271, 272, 273 जवळ, माण