Raigad 10th Result: मुली नाही तर मुलांची बाजी! पोलादपूर तालुका जिल्ह्यात अव्वल, निकालाची सगळीकडे चर्चा

यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे
  • रायगड जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.७७ टक्के असून मुलांनी मुलींवर यश मिळवण्यात आघाडी घेतली आहे
  • पोलादपूर तालुक्याचा निकाल ९७.६२ टक्के असून तो जिल्ह्यातील सर्वाधिक यशस्वी तालुका ठरला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
रायगड:

मेहबूब जमादार 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. रायगड जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम राखत यंदा 93.77 टक्के निकालाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निकालात नेहमीची परंपरा मोडीत निघाली असून मुलींच्या तुलनेत मुलांनी यशाची मोठी बाजी मारली आहे. मुली या मुलांपेक्षा प्रत्येक परिक्षेत सरस ठरतात. पण रायगड जिल्हा यावेळी मात्र अपवाद ठरला आहे. मुलींना मागे टाकत मुलांनी जिल्ह्यात पास होण्यात बाजी मारली आहे. 

पोलादपूर तालुक्याचा डंका, तळा तालुका मागे
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोलादपूर तालुक्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पोलादपूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक 97.62 टक्के लागला आहे. पोलादपूर तालुका  जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. तर दुसरीकडे तळा तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे 86.29 टक्के इतका लागला आहे. निकाल जाहीर होताच पोलादपूरसह जिल्ह्यात सर्वत्र यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. पोलादपूर हा दुर्गम तालुका आहे. शिवाय जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. अशा स्थितीत ही तालुक्यातल्या मुलांनी मिळवलेले यश कौतूकास्पद आहे. 

Advertisement

यंदा मुलांची सरशी
रायगड जिल्ह्यातून यंदा एकूण 37 हजार 373 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 35 हजार 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी मुलींवर केलेली मात. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 17 हजार 666 मुलांनी यश संपादन केले आहे. तर उत्तीर्ण मुलींची संख्या 17 हजार 380 इतकी आहे. अनेक वर्षांनंतर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलींच्या तुलनेत अधिक राहिल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आज संपली आणि रायगडमध्ये जल्लोषाला उधाण आले. यंदा रायगडच्या पोरांनी कमाल केली असून मुलींच्या तुलनेत मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 93.77 टक्के लागला असला तरी खरी चर्चा ही मुलांच्या कामगिरीची आणि पोलादपूर तालुक्याची होत आहे. जिल्ह्यातून 35 हजार 46 विद्यार्थी यशस्वी झाले असून पोलादपूरने 97.62 टक्क्यांसह जिल्ह्यात पहिले येण्याचा मान मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.