जाहिरात

Raigad News : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळला, पाहा ड्रोन VIDEO

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर उसळला आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून,दऱ्याखोऱ्यांतून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले असून ड्रोन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Raigad News : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळला, पाहा ड्रोन VIDEO
Rajyabhishek Sohala 2026 Drone Video

Raigad Fort Shivrajyabhishek Sohala Drone Video : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर उसळला आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून,दऱ्याखोऱ्यांतून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.संपूर्ण गड 'शिवमय'झाला आहे.अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या या अथांग गर्दीमुळे रायगडावरील प्रत्येक कडा भगव्या रंगात न्हाऊन निघाला आहे.'जय भवानी,जय शिवाजी'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून शिवभक्तांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. शिवभक्तांच्या जनसागराचा ड्रोन व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. 

राज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

किल्ले रायगडावर 6 जून 2026 रोजी 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.शिवराज्याभिषेक सोहळ्याला लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर पोहोचले आहेत. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. 

इथे पाहा किल्ले रायगडावरील ड्रोन व्हिडीओ

"1198 पोलीस कर्मचारी, 150 पोलीस अधिकारी, 3 आरसीपी, एक एसआरपी टीम,ड्रोन कंट्रोल टीम यासह अन्य अधिकारी वर्ग शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असणार आहेत. आज किल्ले रायगडावर पायी निघालेल्या शिवभक्तांना पायरी मार्गावर देखील पोलीस तैनात केले जाणार आहेत. पार्किंगचा परिसर ते किल्ले रायगड अशी पोलिसांची विशेष टीम या ठिकाणी असणार आहे",अशी माहिती आंचल दलाल यांनी दिली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com