Matheran News: माथेरान पर्यटकांसाठी पुन्हा खुले! बंदचा निर्णय मागे, फसवणूक रोखण्यासाठी मोठा निर्णय

Hill Station Matheran News: माथेरान बंदला हॉटेल इंडस्ट्रीसह ई रिक्षा संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता. या बंदमुळे पर्यटकांची मोठी निराशा झाली. याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून बंद मागे घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबूब जमादार,  रायगड: माथेरानमध्ये पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात पर्यटन बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली होती. या समितीने सोमवारपासून माथेरान बंदची हाक दिली होती. माथेरान बंदला हॉटेल इंडस्ट्रीसह ई रिक्षा संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता. या बंदमुळे पर्यटकांची मोठी निराशा झाली. याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून हा बंद मागे घेण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद अखेर मागे घेण्यात आला आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शासन व प्रशासन यांच्या सहकार्याने सकारात्मक चर्चा झाली आणि यावर तोडगा काढण्यात आला. माथेरान नगर परिषदेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात बैठक ठेवण्यात आली होती. पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून यासाठी माथेरा च्या प्रवेशद्वारी माहिती केंद्र व वेबसाईट बनवण्याचे ही धोरण निश्चित झाले.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, माथेरान चे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, माथेरान नगर परिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे, पोलीस विभागाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, हॉटेल व्यवसायिक, लॉजिंग व्यवसायिक,  आश्वापाल संघटना, हातगाडी संघटना, रिक्षा संघटना, कुली हमाल संघटना सर्वपक्षीय प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माथेरान पर्यटन संघर्ष समितीचे पदाधिकारी ही उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?

दरम्यान, माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. पर्यटकांना बळजबरीने गावात येण्याऐवजी पॉईंट्स दाखवून उशीरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते. मिनी ट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते, अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जात असल्याचा आरोप करत हा बंद ठेवण्यात आला होता. 

Advertisement