- ताम्हिणी घाटातील पुणे माणगांव मार्गावर थार गाडी अपघातात दरीत कोसळली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे
- अपघाताचे कारण चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दरीत कोसळल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे
- पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी ड्रोनच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले
प्रसाद पाटील, रायगड:
Raigad Tamhini Ghat Accident: पुणे माणगांव मार्गावर ताम्हिणी घाटात मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार गाडी दरीत कोसळली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली असून आणखी प्रवाशांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ताम्हिणी घाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार गाडी दरीत कोसळली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही मोठी दुर्घटना घडली.
याबाबत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी या अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, अपघात कसा झाला हे कळू शकलेलं नाही, मात्र प्रथम दर्शनी चालकाचा कंट्रोल सुटल्याने गाडी दरीत कोसळली असावी. ड्रोनच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 4 डेड बॉडी दिसत आहे. रेस्क्यू टीम त्यांना वर आणण्याचे काम करत आहेत.