MNS Chief Raj Thackeray On Matoshree: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे पालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच ठाकरे बंधुंमध्ये आज पुन्हा एकदा भेट होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झाले आहेत. महापालिकेच्या निवडणुकांआधी दोन्ही ठाकरेंची वाढलेली जवळीक पाहता आजच्या भेटीत काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला
समोर आलेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम मातोश्रीवर पार पडणार आहे. त्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आलेत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे यांच्यासह त्यांच्या आईही मातोश्रीही सोबत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
निवडणुकांआधी भेटीला सिलसिला
मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकाच मंचावर आले. त्यानंतर दोन्ही ठाकरेंमधील भेटीचा सिलसिला वाढत गेला. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी तसेच गणपती उत्सवातही दोन्ही ठाकरेंची भेट झाली होती. मात्र आता पहिल्यांदाच सहकुटुंब दोन्ही ठाकरेंची भेट होत आहे. जरी ही कौटुंबिक भेट असली तरी या भेटीमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सुरु असलेली रणनिती आणि चर्चाही होण्याची शक्यता आहे.