Raj Thackeray: ठाकरे बंधुंची गळाभेट, 20 मिनिटे चर्चा, 'मातोश्री'वरील भेटीमागचे 'राज'कारण काय?

Raj Thackeray- Uddhav Thackeray Meeting: उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांच्यामध्ये 20- 25 मिनिटे चर्चाही झाली. या भेटीनंतर मला खूप आनंद झाला, अशी मोठी प्रतिक्रियाही उद्धव ठाकरेंनी दिली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Raj Thackeray Uddhav Thackeray Meeting Inside Story: मराठीच्या मुद्द्यावरुन झालेल्या ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाचा नवा अंक आज पाहायला मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल झाले. राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संजय राऊत अंबादास दानवेही यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली ही भेट राजकीय वर्तळात अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. 

मातोश्रीवर बंधुभेट! राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. मातोश्री या निवासस्थानी ठाकरे बंधुंची ही भेट झाली. स्वतः उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले. यावेळी दोन्ही भावांमध्ये गळाभेट झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे- राज ठाकरे यांच्यामध्ये 20- 25 मिनिटे चर्चाही झाली. या भेटीनंतर मला खूप आनंद झाला, अशी मोठी प्रतिक्रियाही उद्धव ठाकरेंनी दिली. 

Raj Thackeray: 'मातोश्री'वर बंधुभेट! राज ठाकरे- उद्धव ठाकरेंच्या भेटीला, गळाभेट घेत दिल्या खास शुभेच्छा

राज ठाकरे- उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?

राज ठाकरे (Raj Thackeray) हे मातोश्रीवर दाखल होताच संजय राऊत, अंबादास दानवे यांनी त्यांचे स्वागत गेले. यावेळी मातोश्रीवर जमलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. राज ठाकरेंना घेण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्रीच्या गेटपर्यंत आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी उपस्थितांनाही नमस्कार केला. यावेळी राज ठाकरे- उद्धव ठाकरेंची गळाभेट घेतल्याचे दृश्य पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

उद्धव ठाकरे- राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी दोन्ही भावांनी त्यांच्या एका व्यंगचित्रावर चर्चा केली. त्यानंतर 20- 25 मिनिटांनी राज ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडले. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर आनंदाचे वातावरण होते. हा आनंद राज ठाकरेंच्या एन्ट्रीने आणखी वाढल्याच्या भावना शिवसैनिकांनी व्यक्त केले.

Advertisement

ठाकरे बंधुंची ही वाढदिवसानिमित्त भेट असली तरी त्यामधून राजकीय घडामोडीही घडण्याची शक्यता आहे. एकीकडे महापालिका निवडणुका जवळ येत असतनाच ठाकरे बंधुंमध्ये ही जवळीक वाढल्याचे दिसत आहे. याच महिन्यात ठाकरे बंधुंची भेट झाली होती त्यानंतर ही दुसरी भेट आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या युतीची सुत्रे पाहायला मिळणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. ठाकरे बंधुंच्या या भेटी राज्याच्या राजकारणाला कशी कलाटणी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.