विशाल पुजारी, कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. क्षीरसागर यांच्या या आरोपानंतर राजू शेट्टी यांनी त्या जमिनीचे सातबारे घेऊन या सर्व जमीन तुमच्या नावावर करतो असे आव्हान दिले होते. त्यानुसार आता राजू शेट्टी हे कोल्हापूरच्या बिंदू चौकात दाखल झाले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याच्या आरोप क्षीरसागर यांनी केला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांनी आरोप सिद्ध करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांना बिंदू चौक येथे येण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. सदर जमीनीचे कागदपत्रे सात बारा आमदार राजेश क्षीरसागर घेऊन आल्यास सदरची सर्व जमीन त्यांना बक्षिसपत्र करून देण्यासाठी राजू शेट्टी बिंदू चौक येथे आलेले आहेत.
माझ्या नावावर 500 एकर जमीन असल्याचा जावईशोध आमदार राजेश क्षीरसागर यांनी लावला आहे. सदर जमीनीचे सात बारे राजेश क्षीरसागर यांनीबिंदू चौकात घेऊन यावेत त्यादिवशी सदर सर्व जमीनी त्यांच्या नावाने बक्षिसपत्र करून देवू. माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यांवर नेहमी असे आरोप होतात. मात्र कुणाच्या बुडाखाली अंधार आहे ते जनतेला कळूदे, एकदाच सोक्षमोक्ष लागू दे.. असं चॅलेंज राजू शेट्टी यांनी दिलं आहे.
मी बक्षीसपत्रासह, 500 रुपयांचा स्टॅम्पपेपर घेऊन, त्याच्यावर सर्व मजकूर लिहून आणला आहे. त्यांनी फक्त गट क्रमांक सांगावेत, मी वकिलांनाही घेऊन आलो आहे. त्यावर सही करुन त्यांच्या नावावर करुन देणार आहे. असं म्हणत मी वाट बघत आहे त्यांनी यावे. आणि जर ते येणार नसतील तर त्यांची सर्व कमाई कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला दान करावी, असंही राजू शेट्टी म्हणालेत.
Cabinet Decision : शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता! वाचा राज्य सरकारचे सर्व निर्णय