सुनील दवंगे, प्रतिनिधी
Golden Umbrella Donated To Saibaba Temple : श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र असलेल्या शिर्डी येथील साईबाबा मंदिरात चेन्नई येथील एका साईभक्ताने मोठी देणगी अर्पण केली आहेत. जितेंद्र उमेडी असं या साईभक्ताचं नाव असून त्याने आपल्या नितांत भक्तीभावातून साईचरण 15 किलो वजनाची तांब्याची छत्री अर्पण केली. या छत्रीवर 185 ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा देण्यात आलाय. या सोन्याच्या छत्रीची किंमत जवळपास 22 लाख रुपये आहे. तर अडीच लाख रुपयांचे तांबेही यात वापरण्यात आले आहे. या साई भक्ताने सोन्याच्या छत्रीसह 23 लाखांचा धनादेशही अर्पण केला आहे.ही सोन्याची छत्री साईबाबांच्या मूर्तीच्या वरच्या भागात प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराच्या सोंदर्यात आणखी भर पडली आहे.
या छत्रीचा हस्तांतरण सोहळा साईबाबा संस्थानच्या वतीने पार पडला.संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते ही छत्री साईभक्ताकडून स्वीकारण्यात आली. दराडे यांनी याप्रसंगी साईभक्त जितेंद्र उमेडी यांचा शाल,श्रीफळ आणि साईबाबांची प्रतिमा देऊन सत्कार केला आणि त्यांच्या भक्तीभावाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. तसच जितेंद्र उमेडी यांनी साईबाबा संस्थानला चेकद्वारे 23 लाख रुपयांची देणगीही दिली. जवळपास 47 लाखांची देणगी या भाविकाने साई मंदिरात अर्पण केली आहे.
नक्की वाचा >> काय सांगता! चांदीचे भाव 200000 पार.. मुंबईच्या झवेरी बाजारात ऑर्डर झाल्या बंद, कारण काय?
साईभक्त उमेडी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की,“साईबाबांनी माझ्या जीवनात नेहमी मार्गदर्शन केलं.त्यांच्या कृपेने मला जे काही लाभलं, त्यातून थोडंफार अर्पण करून त्यांच्या सेवेत सहभागी होण्याचा आनंद आहे. नेक दिवसांपासून साई मंदिरात सुवर्ण छत्री देण्याची इच्छा होती. प्रथम एक छत्री तयार केली, मात्र ती पसंत पडली नाही. त्यानंतर दुसरी तयार केली तेव्हा ती अप्रतिम झाली. साई मंदिरात ती लावण्यात आल्याचा आनंद आहे."
नक्की वाचा >> Video माधुरी हत्तीणीवर जीवापाड प्रेम! पण या हत्तीवर लोकांनी फेकले दगड, नेटकरी संतापले, ही माणसं नाहीत..राक्षसच