Sangli News: 'बैलजोडी तयार ठेवा! फॉर्च्युनर जिंकली, आता पुढच्या वर्षी 'ही' गाडी, चंद्रहार पाटलांची मोठी घोषणा

 Sangli Shrinath Kesari Bailgada Sharyat Final: बैलगाडा शर्यत क्षेत्रातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत विजेत्यांना थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर आणि १५० टू-व्हीलर अशी बक्षीसे ठेवण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली:

 Sangli Shrinath Kesari Bailgada Sharyat Final Video:  ‘डबल महाराष्ट्र केसरी'. शिवसेना नेते पैलवान चंद्रहार पाटील यांच्या वतीने आयोजित देशातील पहिले ‘श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत' आणि ‘शिवसेना बैलगाडा शर्यत अधिवेशन' रविवारी पार पडले. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत विजेत्यांना थार, फॉर्च्युनर, ट्रॅक्टर आणि १५० टू-व्हीलर अशी बक्षीसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेनंतर आता चंद्रहार पाटील यांनी पुढील वर्षाच्या शर्यतीसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. 

कोणी पटकावली फॉर्च्युनर? 

बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील सगळ्यात मोठे मैदान सांगलीच्या बोरगाव येथे पार पडले. फॉर्च्यूनर, थार, ट्रॅक्टर, बुलेट दीडशे दुचाकींसाठी हजारो बैलगाड्या गाड्या धावल्या आणि लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत अत्यंत थरारक,अश्या पार पडलेल्या बैलगाडी शर्यती मध्ये हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडीने मैदान मारत श्रीनाथ केसरीचा बहुमान पटकावला आहे. 

पुढच्या शर्यतीसाठी बक्षीस काय?

देशातील सगळ्यात मोठया बैलगाडी शर्यतीचा पैलवान चंद्रहार पाटलांकडून बोरगावच्या कोड्याच्या माळ येथील 500 एकर मैदानावर या शर्यतीचे आयोजन केलं होतं.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी शर्यती पार पडल्यात आणि ज्यामध्ये हेलिकॉप्टर आणि ब्रेकफेल बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत फॉर्च्यूनर गाडी जिंकली आहे.तर या बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा हा मुंबई मंत्रालयासमोर पडणार असल्याचं चंद्रहार पाटलांकडून सांगत या पुढच्या बैलगाडी शर्यतीसाठी बीएमडब्ल्यू गाडी असणार असल्याचे जाहीर केले आहे.