Sangli Politics: खासदार विशाल पाटलांना धक्का! कष्टाने आणलेली सत्ता गेली; सांगलीच्या राजकारणात खळबळ

मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजूळ यांची निवड अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी रद्द केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली:

Sangli Politics:  सांगली जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांना जोर झटका बसल्यानंतर आता काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनाही मोठा धक्का बसला आहे. आधी ईश्वरपूरचे नगराध्यक्षपद रद्द झाल्यानंतर आता मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड रद्द झाली आहे.

काँग्रेस खासदार विशाल पाटलांना मोठा धक्का

समोर आलेल्या माहितीनुसार,  ​सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजूळ यांची निवड अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी रद्द केली आहे. निवडणुकीदरम्यान सदस्य अपहरणाचा प्रकार आणि प्रक्रियेतील अपारदर्शकता यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार विशाल पाटील आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement

​काही दिवसांपूर्वी मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला होता. मात्र, भाजपाच्या सदस्य राणी भोरे आणि पांडुरंग पाटील यांनी या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान दिले होते. निवडणुकीच्या प्रक्रियेत शिवसेनेच्या (शिंदे गट) एका सदस्याचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या याचिकेवर सुनावणी करताना अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी गंभीर दखल घेत दोन्ही पदे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Rain: महाराष्ट्रावर आस्मानी संकट! 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश 

​तसेच, संबंधित पदांसाठी पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. एका मताच्या फरकाने महाविकास आघाडीने सत्ता मिळवली होती, पण आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे हे समीकरण बदलले आहे. सांगलीच्या राजकारणात ईश्वरपूर पाठोपाठ आता मिरजेतही सत्ताधारी गटाला मोठा झटका बसला आहे. आता पुन्हा होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.