Sangola News: झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश केल्यास घरपट्टी माफ! सांगोल्यातील 'या' ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

जवळे ग्रामपंचायत राज्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, सांगोला: जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास ग्रामपंचायतीची घरपट्टी माफ करण्याचा आदर्शन अन् ऐतिहासिक निर्णय सांगोल्यातील जवळे ग्रामपंचायतीने घेतला आहे. झेडपी शाळांसाठी घरपट्टी माफ करणारी जवळे ग्रामपंचायत राज्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जून महिन्यात शाळांची लगबग सुरू होते. शहरासह ग्रामीण भागात कॉन्व्हेन्ट शाळांचे प्रस्थ वाढले आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा पटसंख्येच्या आधारावर टिकल्या पाहिजेत. यासाठी सांगोला तालुक्यातील जवळे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेत घरातील मुलगा अथवा मुलगी शिकत असेल. तर त्यांची घरपट्टी आणि इतर कर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्या 40 वर्षापासून जवळे ग्रामपंचायत कारभार करत आहे. अन् याच जवळे ग्रामपंचायतने मराठी शाळांसाठी थेट घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे झेडपी शाळातील मुलांच्या प्रवेशाने सांगोल्याच्या जवळे ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता टॅक्स फ्री झाल्या आहेत. 

( नक्की वाचा :  GT vs MI : शुबमन गिल आणि हार्दिक पांड्यातील वाद उघड, मैदानातील 2 घटनांमुळे खळबळ! )

दरम्यान, उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आता लवकरच राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जूनपासून तर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत.  विद्यार्थ्यांची किलबिल पुन्हा सुरु होणार असल्याने शिक्षक तसेच पालकांमध्ये उत्साहांचे वातावरण आहे, अशातच जवळे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या आदर्शन निर्णयाची राज्यभरात चर्चा होत आहे. 

Advertisement

Nagaland NCP Crisis: अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का! 7 आमदार फुटले, सत्ताधारी पक्षात प्रवेश