Massajog Protest: धनंजय देशमुखांचे ‘करो या मरो’, गावकऱ्यांची विनंती, घरामध्ये आक्रोश; मस्सजोगमध्ये काय घडतंय?

धनंजय देशमुख यांनी थेट टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली. यावेळी गावकरी त्यांना खाली उतरण्याची विनंती करत होते. मात्र धनंजय देशमुख आपल्या आंदोलनावर ठाम होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Santosh Deshmukh Murder Case Update: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज मस्सजोगमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला एक महिना झाला तरी वेगाने तपास होत नसल्याने गावकऱ्यांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनीही आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज मस्सजोगमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्या, मारेकऱ्यांना फासावर लटकवा.. अशी मागणी करत आज मस्सजोगचे गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मस्सजोगमध्ये गावकऱ्यांनी आज टॉवरवर चढून आंदोलनाचा  इशारा दिला होता. तर धनंजय देशमुख यांनी थेट टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली. यावेळी गावकरी त्यांना खाली उतरण्याची विनंती करत होते. मात्र धनंजय देशमुख आपल्या आंदोलनावर ठाम होते.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांना फोन करुन प्लीज खाली उतरा, मुलाबाळांचा विचार करा असे म्हणत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र देशमुख यांनी आंदोलन सुरुच ठेवले. टाकीवर त्यांना चक्कर आल्याचेही सांगण्यात येत आहे. गावकरीही धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची  विनंती करत होते.

यावेळी बीडचे नवे एसपी नवनीत काँवर यांनीही गावामध्ये धाव घेत धनंजय देशमुख यांची समजूत काढली. मनोज जरांगे यांनी यांनी तब्बल सहा वेळा फोन केल्यानंतर तसेच बीड पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी देखील समजूत काढल्यानंतर देशमुख यांनी दीड तासांनी आंदोलन मागे घेतले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Crime news: शादी डॉट कॉमवर ओळख, लॉजवर शारीरिक संबंध , पुढे मात्र जे झालं ते...

दुसरीकडे धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाने त्यांचे कुटुंबीयही व्यथित झाले असून त्यांच्या पत्नी आणि आईला अश्रु अनावर झाले. धनंजय देशमुख यांनी टाकीची शिडीही काढल्याने  गावामध्ये मोठा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गावातील महिलांनी संताप व्यक्त करत एसपी नवनवीत काँवत यांच्यावर बांगड्याही फेकल्याचं सांगण्यात येत आहे.  सध्या  गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुषमा अंधारेंचा संताप..

उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त "आकां"चे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोग मध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा!! असे म्हणत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी संताप व्यक्त केला आहे. 

Advertisement