Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट! उज्ज्वल निकम यांच्याविरोधात आक्षेप, नेमकं काय घडलं?

सुनावणीआधी एक मोठी अपडेट समोर आली असून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड:

Beed Santosh Deshmukh Murder Case Hearing: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले आहे. गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि टोळीविरुद्ध कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी सुरु आहे. या सुनावणीआधी एक मोठी अपडेट समोर आली असून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. 

उज्वल निकम यांना बदला...  आरोपींच्या वकिलांची मागणी

याबाबत सविस्तर माहिती अशी की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढवणारे सरकारी वकील उज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी आज न्यायालयात आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे याचा या केसवर परिणाम होत आहे असे कारण देत थेट आरोपीच्या वकिलांकडून न्यायालयात आज अर्ज करण्यात आला. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुपारनंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Nashik News : नाशिक हादरलं! जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा नाल्यात सापडला मृतदेह

आज चार्ज फ्रेम होण्याची शक्यता

सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टामध्ये सुरु आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे कोर्टात उपस्थित आहेत. सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंकडुन युक्तिवाद सुरु असून आरोपींवर आज चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे. देखमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले वैद्यकीय कारणास्तव आज गैरहजर आहे तर इतर आरोपी व्हिसीद्वारे हजर आहेत.

नक्की वाचा - Teacher's death : अंडी खात असताना जागीच कोसळले, शिक्षकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वजण हैराण!