Walmik Karad: वाल्मिक कराड अन् नाशिकमधील 'आश्रम' कनेक्शन! तृप्ती देसाईंच्या आरोपांनी नवा ट्वीस्ट, हत्येनंतर काय घडलं?

आता संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंनी मोठा खुलासा केला असून वाल्मिक कराडसह आरोपींचे नाशिक कनेक्शन उघड केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत असून वाल्मिक कराडचे अनेक नवे कारनामे समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात नवनवे गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. अशातच आता संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंनी मोठा खुलासा केला असून वाल्मिक कराडसह आरोपींचे नाशिक कनेक्शन उघड केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मठाचे प्रमुख आणि गुरुमाऊली म्हणून ओळख असलेल्या अण्णासाहेब मोरे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी विष्णू चाटे यांना 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीतील मोरेंच्या आश्रमात आश्रय कोणी दिला ? असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित करत याबाबत CID ने तपासही केल्याचं देसाई यांनी म्हटले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विशेष म्हणजे या मठाबाबत अनेक तक्रारी होत्या मात्र वाल्मीक कराड यांच्या मध्यस्थीने त्या दाबण्यात आल्या असून अण्णा मोरेने अनेक महिलांचे शोषण केले आहेत, ते दुसरे आसाराम बापू असल्याचं वक्तव्यही देसाई यांनी केल्याने दिंडोरीमध्ये आता खळबळ उडाली आहे. दरम्यान या आरोपांना आता अण्णा मोरे यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. 

वाल्मिक कराड हे 16 डिसेंबरला केंद्रात येऊन गेले, मात्र त्यांच्यासोबत विष्णू चाटे नव्हते. त्यानंतर सीआयडी पथक आठ पंधरा दिवसापूर्वी येऊन गेले. मंदिरातील सीसीटीव्ही आम्ही त्यांना दिले. भाविक म्हणून कराड आले होते, त्याची आम्हाला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण  स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी दिले आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Baramati Crime : अंत्यविधीची तयारी थांबली, 9 वर्षांच्या पीयुषच्या शवविच्छेदनानंतर बापाचं घृणास्पद कृत्य समोर )

 वाल्मिक कराडकडून आमच्याशी कोणताही संपर्क नाही. कराड त्यांचे त्यांचे आले आणि दर्शन घेवून निघून गेले. तसेच - आम्ही वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही, तृप्ती देसाई यांच्या आरोपात 1 टक्के देखील सत्य नाही. इथे मंदिरात लाखो भाविक येतात, इथ चुकीच्या प्रवृत्तींना संरक्षण दिलं जात नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.