Walmik Karad: पैशांचा ढीग, फार्महाऊस अन् 11 कोटींचा स्कॅम; वाल्मिक कराडने 140 जणांना कसं लुटलं?

वाल्मिक कराडने अनुदानाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये हडपल्याचे समोर आले होते. या दाव्यानंतर आता एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत.  सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप होत असलेला आणि सध्या खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीच्या अनेक कथा उघडकीस येत आहेत. वाल्मिक कराडने अनुदानाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये हडपल्याचे समोर आले होते. या दाव्यानंतर आता एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ऊसतोड मशिनला 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो म्हणून वाल्मिक कराडने 140 लोकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपुरमधील शेतकऱ्याने हे गंभीर आरोप केले असून भितीपोटी तक्रार केली नसल्याचे म्हटले आहे. दिलीप नागणे यांनी केलेल्या या तक्रारीनंतर आता एक महत्त्वाचा व्हिडिओही समोर आला आहे. 

या व्हिडिओमध्ये ऊस तोडणी मशिनरीचे 140 मालक वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या भेटीला गेल्याचे दिसत आहे. तसेच अनुदान मिळवून देतो म्हणून 140 लोकांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले होते, ते पैसे गोळा करतानाचा फोटोही समोर आला आहे. 

नक्की वाचा - BJP News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

वाल्मिक कराडचे निकटवर्तीय जितेंद्र पालवे हे पैसे घेत असल्याचे फोटो दिसत आहे. पैसे मोजण्यासाठी मशीन सुद्धा वापरण्यात आल्याचं दिसत आहे. या प्रकरणात आता संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली असून या 140 ऊस तोडणी यंत्र मालकांची 11 कोटी 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Advertisement

दरम्यान, पैसे घेण्यासाठी या हार्वेस्टर मालकांना बीडमध्ये बोलावण्यात आले होते. त्याठिकाणी आम्हाला कुठले पैसे? म्हणत दमदाटी केली तसेच हार्वेस्टर मालकांना मारहाण केली. त्यामुळे आम्ही सर्वजण भितीपोटी पळून आलो तसेच कुठे तक्रारही केली नाही असंही या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि् खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत असतानाच आता या नव्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.