Walmik Karad: गंभीर आजारामुळे जिवाला धोका, 24 तास मदतनीस द्या.. वाल्मिक कराडची मोठी मागणी; खास नावाची शिफारस

आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावा अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. यासंबंधी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मोसीन शेख, बीड: राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजत असून यामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सध्या सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोठडीमध्ये कराडला खास सुविधा मिळत असल्याचा आरोप होत आहे. अशातच आता वाल्मिक कराडने आपल्याला गंभीर आजार असल्याचा दावा करत मदतनीस म्हणून खास व्यक्तीच्या नावाची शिफारस केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असून या आजारासाठी  ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही  मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावी अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. यासंबंधी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मशीन वापरण्यासाठी रोहीत कांबळेने प्रशिक्षण घेतले असून मशीन चुकीच्या पध्दतीने लावल्यास आपल्या जिवीतास धोका असल्याचा धक्कादायक दावा कराडने केला आहे. त्यामुळे रोहीत कांबळेला आपल्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये विनंती वाल्मिक कराडने केली आहे. वाल्मिक कराडच्या या दाव्यावर न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्याआधीा काल रात्री वाल्मिक कराड याची एसआयटी पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून तब्बल पावणे दोन तास चौकशी करण्यात आली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर बसवराज तेली हे बीड शहर पोलीस ठाण्यातून पुढील कामासाठी रवाना रवाना झाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणी आता अपात्र ठरणार, निकष ठरले, 'याच' महिलांना मिळणार लाभ

दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत खास सुविधा मिळत असल्याचा आरोप करत थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहले आहे. आपल्याला पोलीस ठाण्यात अरेरावी करण्यात आली असून बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.