Satara Accident: देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स - ट्रकचा भीषण अपघात, 3 जण ठार

इचलकरंजी येथील भाविक उज्जैनला देवदर्शनासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. भाविकांची गाडी ट्रॅव्हल्स यांच्यात सालपे घाटात वळणावर जोरदार धडक झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

सातारा:  गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघातांच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्री नागपूर शहरात बेदरकारपणे गाडी चालवत एका तरुणाला उडवल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानचा साताऱ्यामधून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर आली असून मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा-लोणंद मार्गावर सालपे गावाजवळ रविवारी मध्यरात्री अडीच वाजता मिनी ट्रॅव्हल्स व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण ठार झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. इचलकरंजी येथील भाविक उज्जैनला देवदर्शनासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. भाविकांची गाडी ट्रॅव्हल्स यांच्यात सालपे घाटात वळणावर जोरदार धडक झाली.

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (रा. शिरढोण, कोल्हापूर )आणि रजनी संजय दुर्गुळे (रा. वडगाव, हातकणंगले) हे जागीच ठार झाले तर तर गंभीर जखमी माहिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्सचा अक्षरशः चक्काचूर झाला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  लोणंद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story

दरम्यान,  भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. अनुज कांमडी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  अनुज आपली दुचाकी लाकडी पुलाकडे जात होता. मटार त्याच वेळी आयचित मंदिर रोडवर मालवाहू वाहनाने भरधाव गतीने येऊन दुचाकीला धडक दिली.  यात अनुज गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Advertisement

नक्की वाचा - India Pakistan Tension : सामंजस्याचं पाकिस्तानकडून उल्लंघन, सैन्याला कडक कारवाईचे आदेश; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती