Mahabaleshwar Rain: पावसाचा हाहाकार! महाबळेश्वरमध्ये रस्ता वाहून गेला, वाहतूक ठप्प, पर्यटक अडकले

Mahabaleshwar Heavy Rainfall Update: महाबळेश्वर- तापोळा रोडवरील रस्ताच दरीत वाहून केला आहे. झोळेची खिंड येथे असलेला हा रस्ता दरीत गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mahabaleshwar Tapola Road Flood : राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. अशातच महाबळेश्वरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. महाबळेश्वर- तापोळा रोडवरील रस्ताच दरीत वाहून केला आहे. झोळेची खिंड येथे असलेला हा रस्ता दरीत गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. (Mahabaleshwar Tapola Road Sinks Due To Heavy Rains; Tourists Stuck)

Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचे थैमान! नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, शाळांना सुट्ट्या जाहीर

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमधून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रोडवरील रस्ताच दरीत वाहून केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी वाहतूक ठप्प झाली असून पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

महत्त्वाचं म्हणजे अवघ्या एका वर्षापूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता. वर्षभरातच रस्त्याची अशी दुरावस्था झाल्याने निकृष्ठ दर्जाचे काम केल्याचे समोर आलं आहे. हा रस्ता वाहून गेल्यामुळे काही पर्यटक तापोळ्यात अडकले तर तापोळ्याला जाणारे पर्यटक माघारी फिरले आहेत. या दुर्घटनेमुळे स्थानिकांवर मोठे संकट कोसळले आहे. 

(नक्की वाचा-  Rain Alert : राज्यातील या 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; मुंबई-पुण्यात आज पावसाचा काय आहे अंदाज?)