Satara Politics: 'पालकमंत्र्यांचं विनाकारण आकांडतांडव...', मंत्री जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर पलटवार

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल तपासे, सातारा:

Satara ZP Election BJP Vs Shivsena:  ​सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले आहेत.

साताऱ्यात शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये सामना 

"स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात आहे. असा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. पालकमंत्री कालपासून विनाकारण आकांडतांडव करत आहेत. मागेपुढे पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि पोलिसांची हरेसमेंट करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. चौकात पोलीस दिसला नाही तर त्याला सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जातात," असा आरोपही मंत्री जयकुमार गोरेंनी केला आहे. 

Amravati News: भाजप खासदाराकडून गोतस्करीचे मोठे रॅकेट उघड! पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

"साक्षात पोलीस अधीक्षकांशी बोलताना सुद्धा ते एखाद्या घरगड्याशी बोलल्यासारखे वागतात. हे अत्यंत निंदनीय आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांची ही निवडणूक होती. त्यात पालकमंत्र्यांना आत जाण्याची काय गरज होती? असा सवाल जयकुमार गोरेंनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजवर कधीही अशा पद्धतीने बैठक लागली नव्हती, मग कालच ती कशी लागली? असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला.

मंत्री जयकुमार गोरेंचे शंभुराजेंवर आरोप 

दरम्यान,"ज्या सदस्यांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांना पालकमंत्री स्वतः हाताला धरून आत कसे घेऊन जाऊ शकतात? हा गुन्हा कोणी दाखल केला आहे, हे मीडियाला त्यांनी का सांगितले गेले नाही?" असा सवाल त्यांनी केला.  "जर तुमचा तुमच्याच सदस्यांवर विश्वास नव्हता, तर त्यांना ४५ दिवस डांबून का ठेवले होते? गाडीतून उतरवून त्यांना जबरदस्ती हाताला धरून नेणे ही लोकशाही आहे का? असा सवालही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी उपस्थित केला आहे. 

Advertisement

दरम्यान, "पाटण आणि वाईमध्ये काय चाललंय हे जनतेला माहीत आहे. लक्षात ठेवा, जे पेरलंय ते कधीतरी नक्कीच उगवतं असा इशारा यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना दिला आहे. एकूणच जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर महायुतीमध्येच जोरदार सामना रंगल्याचे दिसत आहे. 

Palghar News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावर कुटुंबाचा भीषण अंत; मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या, भयानक दृश्य