School Holiday: विद्यार्थ्यांची मज्जा! ऑगस्टमध्ये शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या; किती दिवस राहणार बंद? यादी पाहा

महिन्यात शनिवार-रविवारच्या नियमित साप्ताहिक सुट्ट्यांसह अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय आणि धार्मिक सण एकाच वेळी आल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच चांदी होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Schools to Remain Closed for 12 Days in August?:  शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असून आता पहिल्या सत्र परीक्षेचे वेध लागले आहेत. अशातच विद्यार्थी वर्गासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. चालू शैक्षणिक वर्षातील ऑगस्ट महिना विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांची नवी पर्वणी घेऊन आला आहे. या महिन्यात शनिवार-रविवारच्या नियमित साप्ताहिक सुट्ट्यांसह अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय आणि धार्मिक सण एकाच वेळी आल्यामुळे विद्यार्थ्यांची चांगलीच चांदी होणार आहे.

​ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांसोबतच अनेक सण आल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी बऱ्याच सुट्ट्या पडणार आहेत. शनिवार-रविवारची जोड मिळून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या महिन्यात तब्बल १२ दिवसांपर्यंत सुट्ट्या मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, ज्या शाळांमध्ये केवळ रविवारचीच सुट्टी असते, तिथे सुट्ट्यांची संख्या काहीशी कमी असू शकते. मात्र या सणांमुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण काहीसा हलका होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

Advertisement

​या महिन्यात येणाऱ्या सणांवर नजर टाकल्यास, १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार असून हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. तसेच २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद आणि २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हे सण आले आहेत. या सुट्ट्यांच्या संयोगामुळे ऑगस्ट महिन्याचा शेवटचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी खूपच रंजक ठरणार आहे.

LPG Price Today: सर्वसामान्यांसाठी खुशखबर! व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात, नवा दर किती? चेक करा...

ऑगस्टमधील शाळांच्या सुट्ट्यांची यादी! 

साप्ताहिक सुट्ट्या (शनिवार आणि रविवार)

  • 1 जुलै - शनिवार
  • 2 जुलै - रविवार
  • 8 जुलै - शनिवार
  • 9 जुलै - रविवार
  • 15 जुलै - शनिवार, स्वातंत्र्यदिन
  • 16 जुलै - रविवार
  • 22 जुलै - शनिवार
  • 23 जुलै - रविवार
  • 29 जुलै - शनिवार
  • 30 जुलै - रविवार

विशेषतः २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, त्यानंतर २९ रोजी शनिवार आणि ३० ऑगस्ट रोजी रविवार आल्यामुळे विद्यार्थ्यांना सलग तीन दिवसांचा एक मस्त 'लाँग वीकेंड' एन्जॉय करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

​दरम्यान, राज्यानुसार आणि शाळांच्या नियमांनुसार सुट्ट्यांच्या स्वरूपात बदल असू शकतो. तसेच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक शाळांमध्ये सकाळी ध्वजारोहण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही तासांसाठी शाळेत उपस्थित राहावे लागते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही खोट्या याद्यांवर विश्वास न ठेवता, आपल्या पाल्य शिकत असलेल्या शाळेचे अधिकृत कॅलेंडर तपासूनच सुट्ट्यांचे नियोजन करावे.

Nashik Rain Red Alert: नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे मोठे संकट, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी