Shaktipeeth Highway: 'शक्तीपीठ' विरोधात चक्काजाम! पालखी मार्ग रोखला, राजू शेट्टींसह कार्यकर्त्यांची धरपकड

Shaktipeeth Highway Chakka Jam Andolan: आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदलही करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या राजू शेट्टी यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shaktipeeth Expressway Protest:  नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज कोल्हापुरातील पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चक्कजाम आंदोलन होत आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यासह 12 जिल्ह्यांमधील शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेत. अनेक ठिकाणी महामार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session: बीड अत्याचार प्रकरणाची SIT चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरु आहे.  पुणे बंगळूर महामार्गावर माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदलही करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या राजू शेट्टी यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांनी पालखी मार्ग रोखला

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरातही शेतकरी आक्रमक झाले आहेत. हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांचे मोहोळ शहरात आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी मोहोळ-पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग रोखून धरला. वारीच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.  ‘शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय?‘  'राज्याची आर्थिक स्थिती नसताना हजारो कोटी रुपयांचा कशासाठी? असे सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केले. 

Mobile Loan Fraud: ऑनलाईन लोन घेत असाल तर सावधान! महिलांचे मॉर्फ केलेले नग्न फोटो वापरुन 'कर्जलूट'

आंबेजोगाई तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ मार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी धायगुडा पिंपळा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंबेजोगाई परळी तसेच  शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरले. या महामार्गामुळे आमच्या शेतजमिनी जाणार आहेत. यामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त होईल, असा आरोप करत आंदोलक शेतकरी आक्रमक झाले.  एका तासापेक्षा जास्त वेळ आंदोलन सुरूच असल्याने  वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement