अहिल्यानगर: शनी शिंगणापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनि शिंगणापूर मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. एकीकडे शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनि शिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले. नितीन शेटे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात. नितीन शेटे यांच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. एकीकडे शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार चौकशी सुरू असताना झालेल्या या आत्महत्येने नगर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.