Shirdi News: 'ज्याचे रजिस्ट्रेशन, त्यालाच साईबाबांचे दर्शन', मंदिर समिती मोठा निर्णय घेणार? काय आहे संकल्पना?

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ज्याचे रजिस्ट्रेशन त्यालाच दर्शन मिळावे, अशी मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, प्रतिनिधी:

Shirdi Saibaba Temple News:  शिर्डीचे साईबाबा मंदिर हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरदिवशी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. काही दिवसांपूर्वीच साईबाबांच्या मंदिरात भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावरुनच आता भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ज्याचे रजिस्ट्रेशन त्यालाच दर्शन मिळावे, अशी मागणी केली आहे.

सुजय विखेंची मोठी मागणी

शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येक भाविकाचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन व्हावं अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे. सुजय विखे यांच्या या मागणीने चर्चांना उधाण आले आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत भाविक येतो.. त्यामुळे प्रत्येक भावीकाच ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं होणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

Apple Watch Saves Life: ॲपल वॉचमुळे मुंबईतील तरुणाचा वाचला जीव! पुडुचेरीमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यानचा थरार

काय म्हणाले सुजय विखे? 

"काही महिन्यांपूर्वी साईबाबांच्या दरबारात गैरप्रकार घडला होता. त्यावेळी मंदिर प्रमुखांवर झालेले आरोप खरे की खोटे हे सिद्ध करण्यासाठी त्या महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते. मात्र आजपर्यंत पोलीस तिची ओळख पटवू शकले नाही. त्या महिलेला कोणी पाठवले? असा सवाल आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी आता संस्थानला डिजीटल गेट आलेच पाहिजेत. साईभक्तांनी एकदा मोबाईलवर आपला फेस स्कॅन करुन आधारकार्ड ईनॅबल करा आणि मंदिर समितीच्या ऑनलाईन पासवर पोस्ट करा, त्यानंतर तुम्ही चेहरा दाखवून तुम्ही दर्शन घेऊ शकता," असं सुजय विखेंनी सांगितले. 

दरम्यान, "उद्या चोरी झाली, कुणावर चाकू हल्ला झाला तेव्हाही आपण ओळख पटत नाही हे कारण सांगणार आहे का? असा सवाल करत हे चुकीचे आहे. संस्थानकडे पैसा आहे त्याचा पैसा एआयसाठी वापरावा. डिजी यात्रा प्लॅटफॉर्मसारखे प्लॅटफॉर्म संस्थानने निर्माण करावे," अशी मागणीही सुजय विखेंनी यावेळी केली. यावर आता संस्थान काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.