सुनील दवंगे, प्रतिनिधी
Shirdi Saibaba : शिर्डीच्या साईबाबांनी त्यांच्या महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदे यांच्याकडे दिलेल्या नऊ नाण्यांवरून पुन्हा एकदा शिर्डीत चांगलाच वाद निर्माण झालाय. या 9 नाण्यांची संख्या आता चक्क 22 वर गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबीय आणि गायकवाड कुटुंबीयांमध्ये या “पवित्र नाण्यांच्या” खरेपणाहून जुंपलीये.. आता हे प्रकरण थेट साईबाबांच्या डीएनए पर्यंत पोहचल्यानं नव्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी शिर्डीतील स्थानिक ग्रामस्थांनी अरुण गायकवाड यांच्याकडे असलेली नाणी खोटी असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारदारच चौकशीसाठी अनुपस्थित राहिल्याने गायकवाड कुटुंबीयांना दिलासा मिळाला. या पार्श्वभूमीवर अरुण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या ताब्यातील नाणीच खरी असल्याचा दावा करत, “ज्यांना शंका आहे त्यांनी साईबाबांचा डीएनए दाखवावा,” असं धक्कादायक विधान केलंय.
( नक्की वाचा : Guru Purnima 2025: शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात कशी झाली? )
साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचा दावा आहे की “आपल्याकडील नऊ नाणीच खरी असून उरलेली सर्व बनावट आहेत.” त्यामुळे एकूण शिंदे कुटुंबीयांकडे 9, गायकवाडांकडे 9 आणि आणखी एका शिंदे गटाकडे 4 नाणी असल्यानं एकूण 22 नाण्यांवरून नवा गोंधळ निर्माण झालाय.. तर वंशावळीनं आमचीच नाणी खरी असल्याच दावा शिंदे कुटुंबियांनी करत ती लक्ष्मीबाई शिंदे यांच्या मंदिरात दर्शननासाठी ठेवल्याचं शिंदे परिवाराकडून करण्यात आला आहे.
साईबाबांनी व्दारकामाईत लक्ष्मीबाई शिॅदे यांना शंभर वर्षापुर्वी नऊ नाणी दिली असून आता तब्ब्ल बावीस नाणी कशी तयार झाली ? तसेच खरी नऊ नाणी वगळता इतर नाणी साईभक्तांना दर्शनासाठी ठेवणं हा भाविकांसोबत विश्वासघातच म्हणावा लागेल.. आता निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर या सर्व नाण्यांची स्वतंत्र फॉरेन्सिक तपासणी व्हावी, अशी मागणीही साईभक्त आणि ग्रामस्थांकडून करण्यात येतेय. धार्मिक श्रद्धेचा विषय असलेल्या या नाण्यांवरून राजकीय, कौटुंबिक आणि संस्थात्मक संघर्षाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे.