Shirdi Santhan News: शिर्डीमध्ये VIP भाविकांसाठी 'दर्शन ब्रेक' व्यवस्था! साई संस्थानचा मोठा निर्णय

Saibaba Sansthan Darshan Break Arrangement: आता दिवसातून तीन निश्चित वेळांमध्ये व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केल्यानं सामान्य भक्तांच्या दर्शनात अडथळा येणार नाही. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शिर्डी:  साईबाबा मंदिरात व्हीआयपी आणि शिफारस धारक व्यक्तींच्या दर्शनामुळे सामान्य भक्तांना साई दर्शनात होणारा अडथळा दूर करण्यासाठी साईसंस्थानच्या तदर्थ समितीने नवीन ‘ब्रेक दर्शन' व्यवस्था लागू केली आहे. यापूर्वी व्हीआयपी दर्शनासाठी कधीही दर्शन रांग थांबवावी लागत होती, ज्यामुळे सामान्य भक्तांना ताटकळत रहावे लागत होते आणि प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत होता. आता दिवसातून तीन निश्चित वेळांमध्ये व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केल्यानं सामान्य भक्तांच्या दर्शनात अडथळा येणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नव्या नियमांनुसार, शिफारशीद्वारे येणाऱ्या व्हीआयपी आणि मान्यवरांना आता फक्त ठराविक वेळेतच साईदर्शन घेता येणार आहे. यासाठी दिवसातून तीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात सकाळी 9 ते 10 दुपारी 2:30 ते 3:30 आणि रात्री 8 ते 8:30. या वेळेत समाधी मंदिराच्या एका बाजूने ब्रेक दर्शनाची सोय उपलब्ध असेल, ज्यामुळे सामान्य भक्तांची दर्शन रांग अव्याहतपणे सुरू राहील. 

Advertisement

शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये सामान्य भक्तांसोबतच राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती आणि अन्य महत्त्वाच्या तसेच शिफारस धारक व्यक्तींचाही समावेश असतो. यापूर्वी व्हीआयपी दर्शनासाठी दर्शन रांग थांबवावी लागत होती, ज्यामुळे सामान्य भक्तांना तासंतास प्रतीक्षा करावी लागत होती. यामुळे भक्तांमध्ये नाराजी निर्माण होत होती आणि मंदिर प्रशासनावरही दबाव वाढत होता. तसेच, सुरक्षा व्यवस्थेवरही अतिरिक्त ताण येत होता. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी साईसंस्थानच्या तदर्थ समितीने 20 जून रोजी झालेल्या बैठकीत व्हीआयपी दर्शनासाठी निश्चित वेळा ठरवण्याचा निर्णय घेतला. या ‘ब्रेक दर्शन' व्यवस्थेमुळे सामान्य भक्तांच्या दर्शनात खंड पडणार नाही आणि प्रशासकीय कामकाजही सुकर होईल.

Advertisement

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी! वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीवर निर्णय होणार?


सशुल्क दर्शन पास घेणाऱ्या भाविकांना दर्शन कॉम्प्लेक्समधून स्वतंत्र रांगेतून मंदिरापर्यंत जाता येईल, परंतु मंदिरात त्यांना सामान्य भक्तांच्या रांगेतूनच दर्शन घ्यावे लागेल. आरतीसाठीची सशुल्क व्यवस्था मात्र यापूर्वीप्रमाणेच कायम राहणार असून या नवीन प्रणालीतून पदसिध्द राजकीयन नेते, सिलेब्रिटी, न्यायाधिश, शास्त्रज्ञ, अती महत्वाचे व्यक्ती तसेच मोठे देणगीदार, यांना वळगळण्यात आले असल्याच साईसंस्थानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलय..

Advertisement