3 hours ago

Shivsena MNS Morcha LIVE: आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधु एकत्र येत असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे- उद्धव ठाकरेंच्या या युतीची सुरुवात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामधून होत आहे. जागा वाटपाआधी शिवसेना मनसे एकत्र येऊन ठाणेकरांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज ठाण्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठ गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाण्यासह मुंबईमधील शिवसेना ठाकरे आणि मनसेचे प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. 

Oct 13, 2025 17:24 (IST)

Live Updat- मनसेचे अविनाश जाधव ही मोर्चात सहभागी

Live Updat- मनसेचे अविनाश जाधव ही मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे केदार दिघे ही या मोर्चात आहेत.  महापालिकेवर हा धडक मोर्चा काढला जात आहे. यात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. ठाण्यातील वेगवेगळ्या समस्यांसाठी हा मोर्चा काढला जात आहे. 

Oct 13, 2025 17:20 (IST)

Live Update: मोर्चामध्ये भास्कर जाधव, राजन विचारे यांचा सहभाग

Live Update:  मोर्चामध्ये भास्कर जाधव, राजन विचारे यांचा सहभाग घेतला आहे. त्यांच्या बरोबर मनसेचे कार्यकर्तेही खांद्याला खांदा लावून मोर्च्यात सहभागी झाले आहेत. 

Oct 13, 2025 17:19 (IST)

Live Update: शिवसेना मनसेच्या मोर्चाला सुरूवात मोठ्या प्रमाणात गर्दी

Live Update:  शिवसेना मनसेच्या मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. ठाकरे गट आणि मनसेचा हा एकत्रित मोर्चा आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ही पाठींबा दिला आहे. 

Oct 13, 2025 12:46 (IST)

Shiv Sena MNS Thane Morcha Live: भ्रष्टाचारात ठाणे नंबर 1: राजन विचारे

ठाणे पालिकेची अवस्था काय केली तुम्हाला माहिती आहे 

-२०१७ ते २०२५ या कालावधीत एकही निवडणूक घेतली नाही 

-निवडणूक घेण्यासाठी का घाबरता? पालिकेची अवस्था तुम्हाला माहीत आहे काय सुरू आहे 

-३० ते ३५ कोटी देखील महापालिकेकडे नाहीत 

-पालिका लुटून झाल्यानंतर शासनाचे पैसे देखील आणले परंतु त्याचा लेखजोखा नाही 

-सर्व कामे कागदावर आहेत 

-वर्धापन दिनी खुशखबर दिली, अधिकाऱ्याला रंगेहात पकडले 

-ठाणे मध्ये दाखल घेतली नाही, मुंबई acb ने कारवाई केली 

-मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत 

-अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असताना प्रमोशन दिले जाते 

-भरष्टाचारात नंबर वन ठाणे आहे

Advertisement
Oct 13, 2025 12:45 (IST)

Shiv Sena MNS Thane Morcha Live: ठाणे शहरातील समस्यांच्या बाबतीत मोर्चा, अविनाश जाधव

ठाणे शहरातील समस्यांच्या बाबतीत मोर्चा काढण्यात येत आहे. भ्रष्टाचारात ठाण्याचा नंबर लागतो. भ्रष्टाचाराची राजधानी आहे.. शहरातील घोडबंदर  रस्ता आणि वाहतूक कोंडी याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जितेंद्र आव्हाड अडीच वर्षात भोगले आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होणार आहेत. तसेच काँग्रेस बरोबर येण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील.

Oct 13, 2025 12:42 (IST)

Shiv Sena MNS Thane Morcha Live: ठाण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा वचक, भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मोर्चा

एका व्यक्तीमुळे संपूर्ण ठाण्याला भ्रष्टाचारी म्हणतात हे योग्य नाही. महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे हा कोणाचा जवळचा होता याची चौकशी व्हायला पाहिजे. ठाण्यामध्ये तुम्ही कुठून या घोडबंदर निळ्या शेळफाटावरून या तुम्हाला कमीत कमी अडीच ते तीन तास या ट्राफिकमध्ये दररोज वाया घालावा लागतो. ठाण्यामध्ये टँकर माफियांचा मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली आहे घोडबंदर वासीयांची दोन महिन्यांची पाण्याच्या बिल 35 ते 40 लाख रुपये घेतले जात आहे. भ्रष्टाचार हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ठाण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा वचक जास्त आहे तरीसुद्धा आम्ही ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र येऊन लढत आहोत: राजन विचारे