2 months ago

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केली आहे. गड पूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी 9.30 वाजता  श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन होणार आहे. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. 

Jun 06, 2025 21:23 (IST)

Live Update : कसारा घाटात कारमध्ये आढळले 3 मृतदेह

शहापूर तालुक्यातील कसारा घाटात उघडकीस आलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. कसारा घाटात एका कारमध्ये तीन तरुणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर रोडच्या कडेला झाडाझुडपात एका नाल्याजवळ एक कार कोसळली होती. त्यामध्ये हे मृतदेह आढळले आहेत. हे तिन्ही तरुण मुंबईच्या विविध भागातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कसारा पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. 

Jun 06, 2025 19:49 (IST)

Live Update : बांगलादेशला मिळणार लोकनियुक्त सरकार, निवडणुकांच्या तारखांची झाली घोषणा

Bangladesh Election Announcement:  बांगलादेशमध्ये अखेर निवडणुका जाहीर झाल्या आहेत. एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात बांगलादेशमध्ये राष्ट्रीय निवडणुका (national elections) होतील. सध्या बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस (Mohammad Yunus) यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार (interim government) कार्यरत आहे.

Jun 06, 2025 17:56 (IST)

Live Update : JCB फसवणूक प्रकरण, लता हगवणेला कोर्टात भोवळ

पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर कोर्टात जेसीबी फसवणुक प्रकरणाची सुनावणी सुरु होती. त्यावेळी वैष्णवी हगवणेची सासू लता हगवणेला भोवळ आली. जेसीबी विक्रीच्या कटात शशांक हगवणेच्या मित्राला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रणय साठे असं त्याचं असून तो ही बँकेचा रिकव्हरी एजंट आहे.

या प्रकरणात लता आणि शशांक हगवणेसह प्रणय साठेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Jun 06, 2025 17:26 (IST)

LIVE Updates: जालिंदर सुपेकरांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांवरील आरोपांची चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. 

Advertisement
Jun 06, 2025 17:12 (IST)

Live Update : ठाकरे बंधुंच्या युतीवर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाची युती होण्याचे संकेत सध्या मिळत आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांनी देखील आज याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर स्पष्ट उत्तर देणे टाळले. महायुती एकत्र लढणार आणि महायुती एकत्र जिंकणार, असं शिंदे यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं. 

Jun 06, 2025 17:01 (IST)

Live Update : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेला नरधाम ताब्यात

अल्पवयीन पुतणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत काकाला धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील रायपूर गावानजिकच्या जंगलातून पकडण्यात निजामपूर पोलिसांना यश आले. त्याला ताब्यात घेवून पोलीसी खाक्या दाखविताच त्याने पुतणीवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. 

Advertisement
Jun 06, 2025 16:32 (IST)

LIVE Updates: जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत भर, गृहराज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर सध्या अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामधील काही आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. या आरोपांनंतर सुपेकरांच्या अडचणीत भर पडली आहे. 

सुपेकरांवरील आरोपांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगश कदम यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केली आहे. 

Jun 06, 2025 10:54 (IST)

LIVE Updates: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित

किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संतोष देशमुख  यांचे कुटुंबीय उपस्थित आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राजदरबारातील सदरेवर बीडच्या मस्साजोग चे सरपंच संतोष देशमूख यांचे  यांचे भाऊ व बहीण गडावर आलेत.

Advertisement
Jun 06, 2025 10:51 (IST)

LIVE Updates: अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत संपली

अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत संपली 

बारा लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांनी केली अकरावी प्रवेशासाठी नोंदणी 

विभागानुसार अमरावती एक लाख 23 हजार 666 छत्रपती संभाजी नगर एक लाख 40 हजार 81 लातूर 76 हजार 936 मुंबई दोन लाख 92 हजार 603 नागपूर एक लाख 14 हजार 623 पुणे विभागातून 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

राज्यातील 9435 कनिष्ठ महाविद्यालयाने नोंदणी केली आहे केंद्रीय प्रवेश पद्धतीतून 18 लाख 57 हजार 526 जागा तर कोटा पद्धतीतून दोन लाख 25 हजार 514 इतका जागा राज्यात उपलब्ध आहेत

Jun 06, 2025 10:16 (IST)

LIVE Updates: सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित

- सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित

- फक्त प्रवेशाची तारीख आणि कोणाच्या उपस्थितीत प्रवेश करायचा यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू 

- विश्वसनीय सूत्रांची NDTV मराठीला माहिती

- स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून बडगुजरांना भाजपमध्ये दिली जाणार एंट्री

- ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेते पदावर असलेल्या सुधाकर बडगुजर यांची नुकतीच पक्षातून करण्यात आली होती हकालपट्टी

Jun 06, 2025 09:42 (IST)

Solapur News: सोलापुरातील आग प्रकरणात तब्बल 18 दिवसानंतर गुन्हा दाखल

सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीला लागलेल्या आग प्रकरणात तब्बल 18 दिवसानंतर गुन्हा दाखल 

कारखान्याच्या मृत मालकासह मुलगा आणि सुनेला जबाबदार धरून पोलिसात गुन्हा दाखल

18 मे रोजी सोलापुरात झालेल्या या अग्नीकांडात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता 

कारखान्याचे बांधकाम करताना मार्जिन न सोडणे, अनधिकृत बांधकाम करणे, निवासाची परवानगी नसताना कामगारांना निवाससाठी ठवेने असा ठपका पोलिसांनी ठेवलाय

 

याप्रकरणी कारखान्याचे मृत मालक उस्मानभाई मन्सुरी यांच्यासह भूखंड नावावर असणाऱ्या त्यांच्या सुन इशरत हनीफ मन्सुरी आणि मुलगा हनीफ उस्मानभाई मन्सुरी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Jun 06, 2025 08:36 (IST)

LIVE Updates: अमरावती शहरात तब्बल 145 शिकस्त इमारती जीवघेण्या

अमरावती शहरात तब्बल 145 शिकस्त इमारती जीवघेण्या.

महानगरपालिकेंनी नोटीस बजावूनही काही जीवघेण्या इमारती वापरतात.

तीन वर्षांपूर्वी प्रभात चौकातील एक शिकस्त इमारत कोसळून पाच मजुरांचा झाला होता दबून मृत्यू..

अनेक शिकस्त इमारती या नागरी वस्तीमध्ये आहे त्यामुळे त्या जीवघेण्या ठरू शकतात...

सर्वाधिक शिकस्त इमारती झोन क्रमांक दोन मध्ये राजापेठ भागात..

काही शिकस्त इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट

Jun 06, 2025 08:16 (IST)

LIVE Update: आरसीबीच्या विजयाचे सेलिब्रेशन महागात पडले, पुण्यात 30-40 जणांवर गुन्हा

पुण्यातील गुडलक चौकात आरसीबीच्या विजयानंतर सेलिब्रेशन साठी एकत्र जमलेल्या 30-40 जणांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोणतीही पूर्वसूचना न देता परवानगी न घेता गुडलक चौक डेक्कन पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर जल्लोष करीत सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करून इतर लोकांना इजा होईल अशा पद्धतीने मोठमोठ्या आवाजाचे ज्वालाग्रही फटाके फोडून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा निर्माण करून हूल्लड बाजी करून असभ्यवर्तन करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून 30 ते 40 अनोळखी व्यक्ती गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Jun 06, 2025 08:00 (IST)

LIVE Updates: महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष घेणार पुढाकार

महाविकास आघाडीला एकजूट ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष घेणार पुढाकार

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी

विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला

त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले

मात्र आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र राहणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता

माविकास आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षांनी पुढाकार घेतला आहे

येत्या काही आठवड्यात काँग्रेस नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे

Jun 06, 2025 06:40 (IST)

Live Updates: शेतात आढळला विवाहित महिलेचा मृतदेह

नाशिकच्या येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे  एका 40 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह शेत तळ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सीमा कैलास कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव असून,त्यांना तीन अपत्य  आहे.मृत्यूचे कारण अस्पष्ट असून या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करीत आहे. 

Jun 06, 2025 06:37 (IST)

Live Updates: किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक दिन

किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. 

यानिमित्ताने  रायगडावर आज पासूनच उत्साहाचे वातावरण आहे. हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले आहेत. गड पूजन आणि शिरकाई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. होळीच्या माळावर शिवकालीन मर्दानी आणि युद्ध कलेची युवक युवतींनी प्रात्यक्षिके हलगीच्या तालावर सादर करण्यात आली. ती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.